कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2026-27 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींना (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 MAY 2026 3:25PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2026-27 च्या  विपणन हंगामासाठी  14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने 2026-27 विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींत वाढ केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एमएसपीत  सर्वाधिक वाढ सूर्यफूल बियांसाठी (₹622  प्रति क्विंटल) सुचवण्यात आली आहे, त्याखालोखाल कापूस (₹ 557 प्रति क्विंटल), कारळे (नायजरसीड ) (₹515 प्रति क्विंटल) आणि तीळ (₹ 500  प्रति क्विंटल) आहेत .

विपणन हंगाम 2026-27 साठी सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत  :

(रुपये प्रति क्विंटल)

S.

No

.

 

पिके

 

एमएसपी 2026-27

 

Cost* KMS 2026-27

Margin over cost (%)

एमएसपी

MS MSP Increase in 2026-27

 

 

धान्य

2025-

26

2013-

14

over 2025-26

over 2013-14

 

 

 

 

 

 

 

 

1.

 

तांदूळ

सर्वसाधारण

2441

1627

50

2369

1310

72

1131

(86%)

 

ग्रेड ए ^

2461

-

-

2389

1345

72

1116

(83%)

2.

 

ज्वारी

हायब्रीड 

4023

2682

50

3699

1500

324

2523

(168%)

 

मालदांडी ^

4073

-

-

3749

1520

324

2553

(168%)

3.

बाजरी

2900

1858

56

2775

1250

125

1650

(132%)

4.

नाचणी

5205

3470

50

4886

1500

319

3705

(247%)

5.

मका

2410

1544

56

2400

1310

10

1100

(84%)

 

डाळी

6.

तूर

8450

5496

54

8000

4300

450

4150

(97%)

7.

मूग

8780

5438

61

8768

4500

12

4280

(95%)

 

 

8.

उडीद

8200

5418

51

7800

4300

400

3900

(91%)

 

तेलबिया

9.

शेंगदाणा

7517

5011

50

7263

4000

254

3517

(88%)

10.

सूर्यफूल बिया

8343

5562

50

7721

3700

622

4643

(125%)

11.

सोयाबीन (पिवळा)

5708

3805

50

5328

2560

380

3148

(123%)

12.

तीळ

10346

6897

50

9846

4500

500

5846

(130%)

13.

कारळे

10052

6701

50

9537

3500

515

6552

(187%)

 

व्यावसायिक

 

 

 

 

 

 

 

14.

 

कापूस          ()

((मध्यम धाग्याचा कापूस )

)

8267

5511

50

7710

3700

557

4567

(123%)

 

(लांब धाग्याचा कापूस )

8667

-

-

8110

4000

557

4667

(117%)

 

*या खर्चात सर्व अदा केलेले खर्च समाविष्ट आहेत, जसे की भाड्याने घेतलेले मनुष्यबळ, बैल/यंत्राचा वापर , भाड्याने घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते यांसारख्या सामग्रीच्या वापरावरील खर्च, सिंचन शुल्क, अवजारे आणि शेतघरांवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंपसेट चालवण्यासाठी डिझेल/वीज इत्यादी, किरकोळ खर्च आणि कौटुंबिक श्रमाचे  मूल्य.

^ भात (ग्रेड ए), ज्वारी (मालदांडी) आणि कापूस (लांब धाग्याचा) यांच्यासाठी खर्चाची माहिती स्वतंत्रपणे संकलित केलेली नाही.

विपणन हंगाम 2026-27 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढ ही, किमान आधारभूत किंमत, अखिल भारतीय  भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर निश्चित करण्याच्या, केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मधील घोषणेला अनुसरून आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर मिळणारा अपेक्षित नफा मूग या पिकाला सर्वाधिक (61%) मिळेल, त्यानंतर बाजरी (56%), मका (56%) आणि तूर (54%) पिकांना मिळेल असा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक लाभ अपेक्षित आहे.

अलिकडच्या काही वर्षांत, सरकारने तृणधान्यांव्यतिरिक्त कडधान्ये आणि तेलबिया, तसेच पौष्टिक तृणधान्ये/श्री अन्न यांसारख्या पिकांना जास्त किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देऊन त्यांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.

2014-15 ते 2025-26 या कालावधीत धान खरेदी 8418 एलएमटी  होती, तर 2004-05 ते 2013-14 या कालावधीत 4590 एलएमटी धान खरेदी झाली होती.

2014-15 ते 2025-26 या कालावधीत 14 खरीप पिकांची खरेदी 8746 एलएमटी होती, तर 2004-05 ते 2013-14 या कालावधीत 4679 एलएमटी खरेदी झाली.

2014-15 ते 2025-26 या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांना 16.08 लाख कोटी रुपये किमान आधारभूत किंमत म्हणून देण्यात आले, तर 2004-05 ते 2013-14 या कालावधीत शेतकऱ्यांना 4.44 लाख कोटी रुपये देण्यात आले.

2014-15 ते 2025-26 या काळात 14 खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून 18.99 लाख कोटी रुपये देण्यात आले, तर 2004-05 ते 2013-14 या काळात शेतकऱ्यांना 4.75 लाख कोटी रुपये देण्यात आले.

**** 

निलिमा चितळे/सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2260701) अभ्यागत कक्ष : 5