खते विभाग
azadi ka amrit mahotsav

खतांच्या उपलब्धतेत भारत मजबूत स्थितीत:खरीप हंगामाच्या आधी, गरजेच्या तुलनेत 51 टक्के साठा उपलब्ध


खरीप हंगामाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत, खतांच्या साठयात 51 टक्के वाढ; शेतकऱ्यांसाठी रकमेत वाढ होणार नाही

भारताकडे 200 एलएमटी खतांचा राखीव साठा, देशांतर्गत उत्पादन संकटाआधीच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचले

खरीप हंगामात मागणी उच्च स्तरावर असताना पुरेसा साठा सुनिश्चित करण्यासाठी, सरकारकडून 19 एलएमटी खतांच्या जागतिक निविदा प्रक्रियेला मंजुरी

Posted On: 11 MAY 2026 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2026

भारतात खतांची उपलब्धता, भक्कम आणि स्थिर असून, केंद्र सरकार सर्व प्रमुख खत प्रकारांमध्ये गरजेपेक्षा अधिक उपलब्धता असेल याची खातरजमा करत आहे. आगामी खरीप 2026 हंगामासाठी महत्वाचे पाऊल उचलत, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने एकूण खत आवश्यकता 390.54 लाख मेट्रिक टन इतकी असेल, असे मूल्यांकन केले आहे.

आतापर्यंत, देशात, 199.65 लाख मेट्रिक टन साठा असून, खरीप हंगामाच्या एकूण मागणीच्या तुलनेत 51% साठयाची उपलब्धता आहे. एरवी देशात राखीव साठा साधारण 33% इतका असतो, मात्र, यंदा त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यातून, सुधारित आगाऊ साठा आणि कार्यक्षम लॉजिस्टिक व्यवस्थापन दिसून येत आहे.

संकट पूर्व काळातील पुनर्प्राप्ती

अलीकडील संकटाच्या कालावधीनंतर देशांतर्गत उत्पादन आणि आयात यामध्ये वेगाने वाढ झाली असून, एकूण उपलब्धतेत सुमारे 97 लाख मेट्रिक टन खतांची भर पडली आहे. यामध्ये देशांतर्गत उत्पादनाचा वाटा 76.78 लाख मेट्रिक टन  इतका असून, भारतीय बंदरांवर पोहोचलेल्या आयातीत मालाद्वारे 19.94 लाख मेट्रिक टन खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.1.देशांतर्गत उत्पादन आणि खतांची संकटानंतरची आयात;- (लाख टनांमधे)

उत्पादन

संकटानंतरचे देशांतर्गत उत्पादन

आयात

Urea

46.28

12.51

DAP

6.20

0.76

NPKs

15.57

3.79

SSP

8.73

0

MOP

0

2.88

Total

76.78

19.94

जागतिक निविदा आणि भविष्यातील पुरवठा

खतांच्या उच्च मागणीच्या कालावधीत कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये यासाठी भारतीय खत कंपन्यांनी एकत्रित जागतिक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 12 लाख मेट्रिक टन डीएपी (DAP), 4 लाख मेट्रिक टन टीएसपी (TSP) आणि 3 लाख मेट्रिक टन अमोनियम सल्फेट खरेदीचा समावेश आहे. याशिवाय, 5.36 लाख मेट्रिक टन अमोनिया आणि 5.94 लाख मेट्रिक टन सल्फर यांसारख्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठीही निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे.

एसओएच बाहेरच्या स्रोतांमधून निश्चित करण्यात आलेले सुमारे 7 लाख मेट्रिक टन एनपीके खत,  मे आणि जून महिन्यात भारतीय बंदरांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.

किमतींचे स्थैर्य आणि देखरेख

शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सरकारने, महत्वाच्या खतांच्या किमान किरकोळ किमतीत काहीही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.खते विभाग युरिया आणि पी अँड के उत्पादनावर सातत्याने देखरेख ठेवून आहे. तसेच अनुदानाची देयके वेळेत साप्ताहिक आधारावर दिली जात आहेत जेणेकरून, रोख रकमेची पुरवठा साखळी अबाधित राहील.

खत उपलब्धतेशी संबंधित आव्हानांवर मात करण्यासाठी सचिवांच्या अधिकारप्राप्त समूहाने आतापर्यंत आठ बैठकांचे आयोजन केले असून, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात अखंडितपणे खत उपलब्ध होईल याची खातरजमा केली जात आहे.

सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2260014) अभ्यागत कक्ष : 3