पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बडोद्याला जाताना विमानातून सोमनाथ मंदिराचे टिपलेले विलोभनीय छायाचित्र केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
11 MAY 2026 8:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथहून बडोद्याला जात असताना विमानातून टिपलेले सोमनाथ मंदिराचे एक खास छायाचित्र सर्वांबरोबर सामायिक केले आहे. प्रभास पाटणच्या समुद्रकिनाऱ्यावर दिमाखात उभे असलेले सोमनाथ मंदिर हे भक्ती, इतिहास आणि आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे देदीप्यमान प्रतीक असल्याचे मोदी यांनी म्हणले आहे. या शाश्वत मंदिराने अमानुष हल्ले, आक्रमणे आणि शतकांचा काळ सोसला असूनही ते आजही तितक्याच भक्कमतेने उभे आहे. सोमनाथ प्रत्येक भारतीयाला शक्ती, धैर्य आणि नवी आशा देण्याचे कार्य करते, असे त्यांनी नमूद केले.
समाज माध्यम ‘एक्स’ वरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
सोमनाथहून बडोद्याला जात असताना हे छायाचित्र टिपले. प्रभास पाटण इथल्या सागरी किनारी वसलेले सोमनाथ मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि आपल्या संस्कृतीच्या चैतन्याचे तेजस्वी प्रतीक आहे. रानटी हल्ले, परकीय आक्रमणे आणि शतकानुशतके उलटून गेल्यानंतरही हे मंदिर अजरामर राहिले आहे. हे मंदिर शाश्वत आहे. सोमनाथ प्रत्येक भारतीयाला सामर्थ्य, धाडस आणि उमेद देते. हर हर महादेव!"
"सोमनाथ से वडोदरा जाते समय यह तस्वीर खींची है…
प्रभास पाटन के तट पर सोमनाथ मंदिर श्रद्धा, भक्ति और भारत की सनातन संस्कृति का दिव्य प्रतीक बनकर आज भी अडिग खड़ा है। इस पावन मंदिर ने बर्बर आक्रमणों, विदेशी हमलों और सदियों के चुनौतीपूर्ण कालखंड को पार करते हुए अपनी अमर चेतना को अक्षुण्ण रखा है। सोमनाथ हर भारतीय के लिए शक्ति, साहस और उम्मीद का प्रतीक है।
हर हर महादेव!"
सुवर्णा बेडेकर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2260007)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Punjabi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam