पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केली गुजरातमधील सोमनाथची झलक
सोमनाथचे शाश्वत मंदिर सांस्कृतिक धैर्य आणि अखंड भक्तीचे दर्शन घडवते : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 MAY 2026 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ अमृत महोत्सवाची झलक सामायिक केली.
पवित्र सोमनाथ मंदिराच्या उंच शिखरावर डौलाने फडकणारा धर्मध्वज म्हणजे, भारताच्या श्रद्धेच्या विजयाचे प्रतीक असून तो कोट्यवधी भारतीयांच्या सामूहिक चेतनेची दैवी उद्घोष आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. सोमनाथच्या शिखरावरचा भगवा ध्वज हा अखंड भक्तीची जिवंत यशोगाथा आहे, तो अनंतकाळपर्यंत भारताचे गौरवगान गात राहील आणि प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मंदिराच्या इतिहासाची आठवण करून देताना पंतप्रधानांनी नमूद केले की, 1000 वर्षांपूर्वी सोमनाथवर अनेक हल्ल्यांपैकी पहिला हल्ला ज्यांनी केला, त्यांना आपण या भूमीचा आत्मा नष्ट करू शकतो, असे वाटले. भारतमातेच्या अत्यंत धाडसी सुपुत्रांमुळे सोमनाथचे पुनर्निर्माण होत राहिले, असे मोदी यांनी अधोरेखित केले. 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत नव्याने उभारलेल्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे मुक्त केले गेले. त्यावेळी जगाला दिसून आले की, हल्लेखोर इतिहासाच्या धुळीत विलीन झाले असून भारताचा आत्मा अजेय आहे, असे मोदींनी नमूद केले. सोमनाथ मंदिर हे सांस्कृतिक धैर्य आणि अखंड भक्तीचे दर्शन घडवत शाश्वत उभे आहे, असे सांगून त्यांनी सर्वांवर महादेवाचा आशीर्वाद कायम राहावा, अशी प्रार्थना केली.
समाज माध्यम ‘एक्स’ वरील पोस्टच्या मालिकेत पंतप्रधानांनी लिहिले:
"एक हजार वर्षांपूर्वी सोमनाथवर अनेक हल्ल्यांपैकी पहिला हल्ला झाला. अशा हल्ल्यांमध्ये गुंतलेल्यांना वाटले की, ते या भूमीचा आत्मा मोडीत काढू शकतील. पण ते चुकीचे होते. भारतमातेच्या अत्यंत धाडसी सुपुत्रांमुळे सोमनाथचे पुनर्निर्माण होत राहिले.
पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत नव्याने उभारलेल्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे उघडले गेले, त्यामुळे जगाला दिसून आले हल्लेखोर इतिहासाच्या धुळीत हरवले आहेत आणि भारताचा आत्मा अजेय आहे.
सोमनाथ शाश्वत आणि उत्तुंग उभे आहे. ते आपल्या सांस्कृतिक धैर्याचे आणि आपल्या अखंड भक्तीचे दर्शन घडवते. महादेवाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो."
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2259974)
आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam