पंतप्रधान कार्यालय
आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात पंतप्रधानांनी घेतली श्री श्री रवीशंकर यांची भेट
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2026 7:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांची भेट घेतली. मोदी यांनी श्री श्री रवीशंकर यांच्याशी विविध विषयांवर, विशेषतः आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सुरू असलेल्या कार्याबद्दल अत्यंत सखोल चर्चा झाली असे सांगितले. सामाजिक हिताला प्रोत्साहन देण्याविषयी असलेली श्री श्री रविशंकर यांच्या तळमळीचे कौतुक केले आणि संस्थेने आपल्या विविध उपक्रमांद्वारे समाजाची सेवा करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची दखल घेतली.
पंतप्रधाना एक्स या समाज माध्यमावरील संदेश लिहितात,
"आर्ट ऑफ लिव्हिंग इथे श्री श्री रवीशंकर यांची भेट झाली. विविध विषयांवर विशेषतः आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्याविषयी आमच्यात सखोल चर्चा झाली. सामाजिक हितासाठीची त्यांची तळमळ वाखाखण्याजोगी आहे."
@ArtofLiving
@Gurudev”
***
राधिका अघोर/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2259607)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam