संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्र्यांनी त्रिवेंद्रम लष्करी तळाला दिली भेट
Posted On:
09 MAY 2026 8:05AM by PIB Mumbai
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 8 मे 2026 रोजी भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड अंतर्गत असलेल्या त्रिवेंद्रम लष्करी तळाला भेट दिली आणि लष्करी सज्जता तसेच विद्यमान विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान संरक्षण राज्यमंत्र्यांनी जवानांशी संवाद साधला आणि परिचालन सज्जता तसेच तळावर राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. लढाऊ सज्जता वाढवणे आणि संस्थात्मक क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रमुख परिचालन, प्रशासकीय आणि पायाभूत विकास उपक्रमांविषयी त्यांना माहिती देण्यात आली.

संजय सेठ यांनी लष्करी तळावर तैनात सर्व पदांवरील जवानांनी दाखवलेली व्यावसायिकता, समर्पण आणि अढळ वचनबद्धतेचे कौतुक केले. सशस्त्र दलातील जवान, त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासोबतच उच्च दर्जाची परिचालन सज्जता कायम राखल्याबद्दल त्यांनी या दलाची प्रशंसा केली.
भविष्यासाठी सज्ज आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम भारतीय लष्कर उभारण्याच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाला अनुरुप, आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि सशस्त्र दलातील जवानांसाठीच्या निरंतर कल्याणकारी उपक्रमांद्वारे संरक्षण क्षमता मजबूत करण्यावर सरकारचा निरंतर भर राहील, अशी ग्वाही संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिली.
***
माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259414)
अभ्यागत कक्ष : 8