पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली 

प्रविष्टि तिथि: 09 MAY 2026 9:06AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त आज त्यांना आदरांजली अर्पण केली.

शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून महाराणा प्रताप यांचे नाव अमर झाले आहे. या महान योद्ध्याने आपल्या मातृभूमीचा स्वाभिमान, प्रतिष्ठा व सन्मान जपण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

महाराणा प्रताप यांच्या शौर्याच्या, धैर्याच्या व अदम्य आत्मसन्मानाच्या गाथा युगानुयुगे देशवासीयांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे दीप प्रज्वलित करत राहतील, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात म्हटले की,

“वीरता आणि पराक्रमाचे अमर प्रतीक असलेल्या देशाचे महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली. या महान योद्ध्याने आपल्या मातृभूमीचा स्वाभिमान, प्रतिष्ठा व सन्मान जपण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. महाराणा प्रताप यांच्या शौर्याच्या, धैर्याच्या व अदम्य आत्मसन्मानाच्या गाथा युगानुयुगे देशवासीयांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे दीप प्रज्वलित करत राहतील.”

***

आशिष सांगळे / उमा रायकर /परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2259313) आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam