अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये शेड्युल्ड कमर्शियल बँक्स (SCBs) नी 15.9% ची मजबूत पतपुरवठा वाढ नोंदवली, आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी वाढ आणि वाढती पत मागणी दिसून आली

Posted On: 05 MAY 2026 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2026

 

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये खाद्यान्नेतर क्षेत्रात 15.9% ची भरीव पत वाढ दिसून आली, 2025 मधील त्याच कालावधीत ही वाढ 10.9% होती, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये त्यात 497 बेसिस पॉइंट्स (bps) इतकी लक्षणीय वाढ नोंदली गेली. मार्च-2026 मध्ये एकूण कर्ज थकबाकी ₹212.9 लाख कोटींवर पोहोचली, मागील वर्षाच्या तुलनेत ती ₹29.2 लाख कोटीने अधिक आहे.

व्याजदर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारच्या अनुदानामुळे कॅपेक्स वेळापत्रकाला संरचनात्मक सुधारणांची मदत मिळत आहे.  खाजगी गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ होत आहे आणि त्यामुळे देशांतर्गत कर्जाची मागणी वाढली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर कॉर्पोरेट तसेच सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे.

वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये झालेली पत वाढ व्यापक आधारावर झाली असून त्यात सेवा क्षेत्रातली वाढ सर्वाधिक आहे, त्याखालोखाल  वैयक्तिक कर्ज विभाग, कृषी आणि संलग्न व्यवहार आणि उद्योग क्षेत्रात वाढ दिसून आली.

  • कृषी व संलग्न उपक्रम : मागील वर्षात या क्षेत्रात 10.4% पतपुरवठा वाढ झाली होती, त्या तुलनेत यावर्षी 528 bps वाढ नोंदवत ती 15.7% पर्यंत गेली आहे. कृषी क्षेत्राला सरकारचे साहाय्य मिळाल्याचे यातून दिसून येते.
  • औद्योगिक क्षेत्र : मागील वर्षी या क्षेत्राला मिळालेला पतपुरवठा 8.2% होता, यावर्षी तो जवळजवळ दुप्पट झाल्यामुळे 15% वर पोचला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या पतपुरवठ्यात 33.1% वाढ होऊन तो 3.7 पटीने वाढला आहे. मध्यम उद्योगांच्या पतपुरवठ्यातही सकारात्मक कल दिसून आले आणि तो यावर्षी 21.7% वाढला आहे.
  • सेवा क्षेत्र : एकूण पतपुरवठ्यापैकी 33%हिस्सा सेवा क्षेत्राचा आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये त्यात 19.0% अशी भरीव वाढ झाली, (गेल्या वर्षी याच कालावधीत  त्यात 12.0% वाढ नोंदवली गेली होती)  
  • वैयक्तिक कर्ज क्षेत्र : एकूण पतपुरवठ्यापैकी 33% हिस्सा वैयक्तिक कर्ज क्षेत्राचा आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये त्यात 16.2% ची वाढ झाली , गेल्या आर्थिक वर्षातील 11.7% वाढीच्या तुलनेत त्यात 455 bps ची वाढ झाल्याचे दिसून येते. गृहकर्ज क्षेत्रात स्थिर वाढ दिसून आली, तर वाहन कर्ज व सोने तारण कर्जाच्या प्रमाणात मोठी वाढ नोंदवली गेली.

भरीव पतपुरवठा वाढीमुळे देशांतर्गत आर्थिक परिसंस्थेत वाढलेली लवचिकता, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात पतपुरवठ्यासाठी वाढणारी मागणी  दिसून येते. व पतपुरवठ्याच्या वाढत्या उपलब्धतेमुळे कॉर्पोरेट्स आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीच्या व भांडवली खर्चाच्या  गरजांसाठी पतपुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.  त्यामुळे उद्योगांच्या क्षमतेत वाढ होऊन त्याचे पर्यवसान म्हणून औद्योगिक उपक्रमांमध्ये तसेच रोजगारनिर्मितीत वाढ होत आहे.  

 

* * *

सुषमा काणे/उमा रायकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2258137) अभ्यागत कक्ष : 9