पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा केला निषेध, शांतता आणि प्रादेशिक स्थिरतेला भारताच्या समर्थनाचा केला पुनरुच्चार

Posted On: 05 MAY 2026 2:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.

नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हे अजिबात स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी सांगितले.

भारत युएईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संवाद आणि राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून सर्व समस्यांच्या शांततापूर्ण निराकरणाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

चिरस्थायी प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि निर्बाध नौवहन सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले आहे;

संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे स्वीकारार्ह नाही.

भारत संयुक्त अरब अमिरातीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तसेच संवाद आणि राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून सर्व समस्यांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार करतो.

शाश्वत प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि निर्बाध जलवाहतूक सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे.”

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2258005) अभ्यागत कक्ष : 10