पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतील शहादरा जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पीएमएनआरएफ निधीतून सानुग्रह अनुदानाची पंतप्रधानांची घोषणा

Posted On: 03 MAY 2026 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपल्या नातेवाईकांना गमावले त्यांच्याप्रती पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या असून, घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना  पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल अशी घोषणा मोदींनी केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमांवर लिहिले आहे -

दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी अत्यंत वेदनादायी आहे. ज्यांनी आपले नातेवाईक यामध्ये गमावले आहेत त्यांच्या प्रति संवेदना आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना.

पीएमएनआरएफमधून मृतांच्या निकटवर्तीय नातेवाईकाला 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपयांची मदत केली जाईलः पंतप्रधान

 

* * *

सुषमा काणे/विजयालक्ष्‍मी साळवी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257698) अभ्यागत कक्ष : 13