शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एनटीए मुख्यालयाला भेट; नीट यूजी 2026 च्या व्यवस्थेचा घेतला आढावा

Posted On: 03 MAY 2026 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2026


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) मुख्यालयाला भेट दिली.

भेटीदरम्यान मंत्र्यांनी परीक्षा व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबींची पाहणी केली. परीक्षा आयोजनाशी संबंधित सामग्री व्यवस्थापन, परीक्षा केंद्रांशी समन्वय, तसेच देशभरात परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी उभारण्यात आलेल्या देखरेख  यंत्रणांची पाहणी केली. मोठ्या संख्येने परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांचे  व्यवस्थापन आणि परीक्षा केंद्रांवर शिस्त राखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांची माहिती  अधिकाऱ्यांनी त्यांना  यावेळी  दिली.

   

   

राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे सुमारे 23 लाख नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी नीट यूजी 2026 परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर कडक कार्यप्रणालीच्या अधीन राहून घेतली जात आहे.

नीट यूजी ही भारतातील सर्वात मोठ्या पदवीपूर्व प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा देशातील विविध संस्थांमधील एमबीबीएस, बीडीएस आणि इतर संलग्न वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य आहे. 

 

* * *

सुषमा काणे/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257688) अभ्यागत कक्ष : 13