नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय सूर्य दिनानिमित्त ‘रन फाॅर सन’ मॅरेथॉनचे आयोजन
एप्रिल 2026 मध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापनेत विक्रमी टप्पा गाठत 2.7 लाख सौर पॅनल बसवण्यात आले
प्रविष्टि तिथि:
03 MAY 2026 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2026
आंतरराष्ट्रीय सूर्य दिन निमित्त 3 मे 2026 रोजी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ‘रन फाॅर सन’ मॅरेथॉनचे आयोजन केले. लाखो घरांमध्ये आणि जीवनात प्रकाश पोहचवलेल्या तसेच पुढील पिढ्यांसाठीही हे करत राहणार असलेल्या सौर शक्तीला केलेले हे अभिवादन होते.
या कार्यक्रमात 1,50,000 मेगावॅटपेक्षा अधिक सौर ऊर्जा स्थापित क्षमतेचा आणि पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना अंतर्गत झालेल्या परिवर्तनात्मक प्रगतीचा गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत 30 लाख छतावरील सौर उर्जा प्रणाली स्थापनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, एप्रिल 2026 मध्ये एकाच महिन्यात सर्वाधिक 2.7 लाख सौर पॅनल स्थापनेची यात नोंद झाली. देशभरातील 45 लाखांहून अधिक कुटुंबांना छतावर सौर उर्जा प्रणालीचा लाभ झाला आहे.

पश्चिम आशियातील वाढत्या ऊर्जा अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारताचे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र, विशेषतः सौर ऊर्जा, आत्मनिर्भरतेला केवळ संकल्पनेतून वास्तवात आणण्यात यशस्वी ठरले आहे. या वर्षी ३१ मार्च पर्यंत, भारताची एकूण सौर क्षमता 150 गिगावॅट इतकी झाली आहे. यामध्ये 2014 मधील केवळ 2.82 गिगावॅटवरून ही क्षमता वाढून 12 वर्षांत 53 पट वाढल्याचे स्पष्ट होते. यापैकी शेवटचे 50 गिगावॅट अवघ्या 15 महिन्यांत जोडले गेले असून आपल्या इतिहासातील ही सर्वात वेगवान वाढ आहे. सध्या भारताच्या एकूण स्थापित वीज क्षमतेपैकी सुमारे 50% क्षमता ही जीवाश्म इंधनाव्यतिरिक्त स्रोतांमधून येते. वर्ष 2030 च्या लक्ष्यापूर्वीच हे साध्य झाले असून, स्वच्छ ऊर्जा संक्रमणात भारताची जागतिक नेतृत्वाची भूमिका अधिक बळकट झाली आहे.

'रन फॉर सन' या 2 किमी आणि 5 किमी अंतराच्या शर्यती नवी दिल्लीतील मेजऱ ध्यानचंद मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये सर्व वयोगटांतीन नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशाच्या 'स्वच्छ ऊर्जा मोहिमे'विषयी नागरिकांमध्ये वाढत असलेल्या सार्वजनिक भागदारीच्या भावनेचे हे प्रतीक आहे.
या प्रसंगी बोलताना, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी म्हणाले की, 'रन फॉर सन' ही केवळ एक मॅराथॉन नाही तर अधिक शाश्वत आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललेले सामूहिक पाऊल आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत जागतिक नेतृत्व म्हणून असलेले स्थान अधिक बळकट करत असताना, पीएम सूर्य घर- मोफत वीज योजनेद्वारे सौर उर्जेची उपलब्धता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जेणेकरून स्वच्छ उर्जेच्या बदलाचे लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल.

स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये भारत सध्या जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 'रन फॉर सन' या कार्यक्रमामुळे, भारताच्या सौर ऊर्जा प्रवासाची व्याप्ती अधोरेखित करणे आणि ही गती कायम राखत देशभरात सौर उर्जेचा विस्तार वेगाने करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हा कार्यक्रम भारताच्या सौर उर्जेला चालना देण्याच्या आणि एक छत, एक घर, एक सूर्य घर या तत्वावर राबवल्या जाणाऱ्या पीएम सूर्य घर- मोफत वीज योजना या अंतर्गत नागरीक केंद्रित स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला प्रोत्साहन देण्याच्या देशाच्या कटिबद्धतेची सामूहिक पुष्टी करतो.

* * *
सुषमा काणे/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2257626)
आगंतुक पटल : 54