पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शेअर केले उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेची परिणती यशात कशी होते हे स्पष्ट करणारे संस्कृत सुभाषित
प्रविष्टि तिथि:
30 APR 2026 3:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेअर केलेल्या संस्कृत सुभाषितामध्ये, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा एखाद्या व्यक्तीला तिच्या कार्यात सातत्याने सक्रिय राहण्यास कशा प्रकारे प्रेरित करतात हे विशद केले आहे.
हा कधीही न ढळणारा उत्साहच व्यक्तीने हाती घेतलेली कामे तडीस नेण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना यश मिळवून देणारा असतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
एक्स समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतातः
"कृतीशील आणि ऊर्जेने भरलेले नागरिक हीच राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांच्या परिश्रमांमुळे विकासाचे नवे मार्ग निश्चित होतात. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देश समृद्धी, स्वयंपूर्णता आणि उन्नतीचे शिखर गाठतो.
अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः।
करोति सफलं जन्तोः कर्म यच्च करोति सः॥"
उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा व्यक्तीला आपल्या कृतींमध्ये सातत्याने सक्रिय राहण्यास प्रेरित करतात. हा अढळ उत्साहच व्यक्तीचे सर्व संकल्प यशस्वी करतो.
* * *
नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2256927)
आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam