पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी निस्वार्थ दानाचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले

Posted On: 23 APR 2026 10:02AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निस्वार्थ दानाचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

“पद्माकरं दिनकरो विकचीकरोति चन्द्रो विकासयति कैरवचक्रवालम्।

नाभ्यर्थितो जलधरोऽपि जलं ददाति सन्तः स्वयं परहितेषु कृताभियोगाः।।"

या सुभाषिताचा अर्थ असा, ज्याप्रमाणे सूर्य कमळाला फुलण्यास मदत करतो, आणि चंद्र कुमुदिनींना फुलवतो, ज्याप्रमाणे मेघ स्वतःहूनच जलवर्षाव करतात; त्याचप्रमाणे, सज्जन लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता इतरांचे भले करतात."

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे,

“पद्माकरं दिनकरो विकचीकरोति चन्द्रो विकासयति कैरवचक्रवालम्।

नाभ्यर्थितो जलधरोऽपि जलं ददाति सन्तः स्वयं परहितेषु कृताभियोगाः।।"

***

NehaKulkarni / VaibhaviJoshi / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2254750) अभ्यागत कक्ष : 18