पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर झालेला चारधाम यात्रेचा प्रारंभ याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शुभचिंतन


पंतप्रधानांनी सर्व भाविकांना लिहिलेल्या पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

Posted On: 22 APR 2026 2:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2026

 

पंतप्रधानांनी आज देवभूमी उत्तराखंडमधील श्री केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या पवित्र प्रसंगी श्रद्धापूर्वक आदर व्यक्त केला. यासोबतच यंदाच्या चारधाम यात्रेचा प्रारंभही झाला. पंतप्रधानांनी उत्तराखंड येथे यात्रेच्या निमित्ताने जाणाऱ्या सर्व भाविकांना पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांच्या क्षेमकल्याणासाठी प्रार्थना केली आहे.

या पवित्र प्रसंगाचे अध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की केदारनाथ धाम आणि चारधामची यात्रा म्हणजे भारतीयांची अतूट श्रद्धा, एकता आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा दैवी उत्सव आहे.  अशा यात्रांमधून आपल्याला देशाच्या शाश्वत वारशाची आणि अध्यात्मिक अनुभूतीची झलक पाहायला मिळते.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:

देवभूमी उत्तराखंड येथील पवित्र भूमीवर आज श्री केदारनाथ मंदिराचे दरवाजे विधिवतपणे आपल्या सारख्या सर्व भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत.

केदारनाथ आणि चारधामची यात्रा ही आपली श्रद्धा, एकता आणि समृद्ध परंपरांचा दिव्य उत्सव आहे. या यात्रांमुळे आपल्याला भारताच्या शाश्वत संस्कृतीचे देखील दर्शन होते.

यावर्षी चारधाम यात्रेच्या प्रारंभानिमित्त उत्तराखंडला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मी एक पत्र लिहून माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझी इच्छा आहे की बाबा केदार आपणा सर्वांवर आशीर्वाद देवो आणि तुमचा प्रवास शुभ करो.

हर हर महादेव!

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2254465) अभ्यागत कक्ष : 12