पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले

Posted On: 19 APR 2026 6:46PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील विरुधुनगर जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात लिहिले:

तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना: पंतप्रधान @narendramodi”

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2253596) अभ्यागत कक्ष : 12