कंपनी व्यवहार मंत्रालय
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून (एमसीए) कंपनी (स्थापना) नियम, 2014 चे पुनरावलोकन करण्यासाठी आणि कंपनी कायदा, 2013 अंतर्गत फाइलिंग प्रक्रियेच्या सुसूत्रीकरणासाठी सार्वजनिक सूचना आमंत्रित केल्या जात आहेत
Posted On:
17 APR 2026 9:05AM by PIB Mumbai
कंपनी (स्थापना) नियम, 2014 मध्ये सुधारणा प्रस्तावित करणारी, 'कंपनी (स्थापना) सुधारणा नियम, 2026' मथळ्याची एक मसुदा अधिसूचना 8 एप्रिल 2026 रोजीच्या सार्वजनिक सूचनेद्वारे तयार करण्यात आली आहे. ही अधिसूचना सार्वजनिक विचारविनिमयाच्या उद्देशाने हितधारकांच्या माहितीसाठी www.mca.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रस्तावित सुधारणांवरील सूचना/अभिप्राय, संक्षिप्त स्पष्टीकरणासह, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ई-सल्लामसलत मॉड्यूलद्वारे 9 मे 2026 पर्यंत सादर करावेत.
याव्यतिरिक्त, कार्पोरेट व्यवहार मंत्रालय हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या (आयआयसीए) मार्फत, कंपनी कायदा, 2013 अंतर्गत फाइलिंग आणि अनुपालन प्रणाली सुलभ करण्यासाठी भागधारकांचे मत जाणून घेण्याकरिता सल्लामसलत प्रक्रिया राबवत आहे. यासाठीचे संकल्पना पत्र (Concept note) सार्वजनिक सल्लामसलतीच्या उद्देशाने भागधारकांच्या माहितीसाठी www.mca.gov.in आणि https://iica.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सल्लामसलतीमध्ये कॉर्पोरेट जीवनचक्राच्या तीन टप्प्यांचा समावेश आहे – प्रवेश, कार्यप्रणाली आणि निर्गमन. https://iica.nic.in/mcaeodbform या वेबलिंकचा वापर करून आपले अभिप्राय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करता येतील. अभिप्राय सादर करण्याची मुदत 15 मे 2026 पर्यंत आहे.
***
NehaKulkarni \ ShraddhaMukhedkar \ DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252924)
अभ्यागत कक्ष : 18