पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीच्या सामर्थ्य आणि योगदानावर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
Posted On:
17 APR 2026 8:50AM by PIB Mumbai
नारी शक्ती ही एका बलवान भारताची ओळख आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील माता, भगिनी आणि कन्या आपल्या अढळ निर्धार, समर्पण आणि सेवाभावाच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात भारताचा अभिमान वाढवत आहेत.
पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला-
“देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या निश्शेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या ।
तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां भक्त्या नताः स्म विदधातु शुभानि सा नः ।।”
या श्लोकात सर्व देवता आणि महान ऋषी ज्यांची पूजा करतात त्या अंबिकेला आदरपूर्वक वंदन करण्यात आले आहे. आपल्या दिव्य शक्तीने संपूर्ण विश्व व्यापून राहिलेल्या आणि सर्व देवतांच्या सामूहिक शक्तीचे मूर्त स्वरूप असलेल्या त्या विश्वमातेने सर्वांचे कल्याण करावे, अशी प्रार्थना या श्लोकातून व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात लिहिले;
“आपली नारी शक्ती ही सशक्त भारताची ओळख आहे. देशातील माता-भगिनी आणि कन्या आपल्या अटूट संकल्पशक्ती, निष्ठा आणि सेवाभावाच्या बळावर आज प्रत्येक क्षेत्रात भारताचा अभिमान वाढवत आहेत.”
देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या निश्शेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या ।
तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां भक्त्या नताः स्म विदधातु शुभानि सा नः ।।”
***
NehaKulkarni / ShradhhaMukhedkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252867)
अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam