अर्थ मंत्रालय
एलआयसीने ग्राहक अनुभव आणि डिजिटल सुलभता वाढवण्यासाठी ‘मायएलआयसी’ आणि ‘सुपर सेल्स साथी’ मोबाईल ॲप्लिकेशन्स केली सादर
हा उपक्रम पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित सेवांसह एक सर्वसमावेशक, तंत्रज्ञान-सक्षम विमा क्षेत्र उभारण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची करतो पुष्टी
Posted On:
15 APR 2026 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू, आयएएस, यांनी आज मुंबईत एलआयसी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आर. दोराईस्वामी, व्यवस्थापकीय संचालक दिनेश पंत, रत्नाकर पटनायक, आर. चंदर आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या उपस्थितीत एलआयसीचे नवीन ग्राहक ॲप (मायएलआयसी) आणि विक्री मध्यस्थांसाठीचे मोबाईल ॲप (एलआयसीचे सुपर सेल्स साथी) यांचे अनावरण केले. 26 कोटींहून अधिक पॉलिसी आणि भारतातील सर्वात व्यापक विमा पदचिन्हासह एलआयसीची ॲप्स आता बदलत्या जीवन विमा बाजारपेठेत व्याप्ती वाढवण्यासाठी, सेवेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच स्पर्धात्मक समानता टिकवून ठेवण्यासाठी केंद्रस्थान मिळवून आहेत.


मायएलआयसी ॲप पॉलिसी सर्व्हिसिंग, क्लेम सपोर्ट, पेमेंट्स, डॉक्युमेंटेशन आणि कस्टमर एंगेजमेंट या सर्वांना एकाच, सहजसोप्या 360-डिग्री डिजिटल अनुभवात एकत्र आणते. हे ॲप कागदपत्रांचे काम पूर्णपणे काढून टाकण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करते आणि पॉलिसीधारकांना त्यांच्या आर्थिक संरक्षणाच्या प्रवासाची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्यास सक्षम करते. हा नवीन डिजिटल मंच केवळ ग्राहकांपुरता मर्यादित नाही. ‘सुपर सेल्स साथी ॲप’ एलआयसीच्या मध्यस्थांना विपणन दूरदृष्टी, कामगिरीचा वेध, ग्राहकांची वैशिष्ट्ये आणि पॉलिसी सर्व्हिसिंगसाठी असलेल्या डिजिटल साधनांच्या माध्यमातून तर प्रत्यक्ष क्षेत्रातील मनुष्यबळाला ऑनबोर्डिंगपासून सर्व्हिसिंगपर्यंतच्या माध्यमातून कुटुंबांना अधिक कार्यक्षमतेने आणि आत्मविश्वासाने सेवा देण्यासाठी सक्षम करते.
मायएलआयसी ॲप – प्रमुख ग्राहक-केंद्रित सुविधा
विमा पोर्टफोलिओ एकाच ठिकाणी पहा आणि व्यवस्थापित करा
प्रीमियम त्वरित भरा
पॉलिसीच्या लाभांचा रिअल-टाइममध्ये मागोवा घ्या
पेपरलेस पॉलिसी कर्जाचा लाभ घ्या
पॉलिसी ऑनलाइन अपडेट करा
कालबाह्य झालेल्या पॉलिसी ऑनलाइन पुनरुज्जीवित करा
ऑनलाइन पॉलिसी शोधा आणि खरेदी करा – सोपे, जलद आणि डिजिटली
जलद, सुरक्षित आणि कागदविरहित ई-केवायसी
सुपर सेल्स साथी – प्रमुख विपणन-केंद्रित क्षमता
डिजिटल विक्री साधने
पॉलिसीच्या स्थितीचा रिअल-टाइम मागोवा
फॉलो-अपसाठी स्वयंचलित स्मरणपत्रे
ग्राहकांशी एकात्मिक संवाद
ग्राहक मूल्यवृद्धीसाठी एआय-चालित सूचना
प्रवासात सादरीकरणासाठी डिजिटल सेल्स किट्स आणि उत्पादन स्पष्टीकरणे
मध्यस्थांना लक्ष्य आणि कामगिरीचे निरीक्षण करण्यास मदत करणारे कामगिरी डॅशबोर्ड
वरील दोन्ही मोबाईल ॲप्स एलआयसीच्या – ‘डीआयव्हीई’ (डिजिटल इनोव्हेशन अँड व्हॅल्यू एन्हांसमेंट) डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्लॅटफॉर्मद्वारे सादर केली जातात, जो ग्राहक, मध्यस्थ आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अखंड, सुरक्षित आणि पूर्णपणे एकात्मिक विमा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252375)
अभ्यागत कक्ष : 40