वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाणिज्य मंत्रालयाने वाणिज्य विभागासाठी नवीन एकीकृत संकेतस्थळ केले सुरू


नवीन मोबाईल ॲप्लिकेशनमुळे विनाव्यत्यय व्यापार सुलभ होईल आणि ई-गव्हर्नन्स अधिक मजबूत होईल

Posted On: 15 APR 2026 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज, म्हणजेच 15 एप्रिल  2026 रोजी, वाणिज्य विभागासाठी एक आधुनिक, सुलभ आणि एकीकृत संकेतस्थळ सुरू केले आहे,जे  डिजिटल ब्रँड आयडेंटिटी मॅन्युअल (DBIM)3.0 आणि भारतीय सरकारी संकेतस्थळासाठी मार्गदर्शक तत्वांचे  (GIGW) पूर्णपणे पालन करते. हे नवीन व्यासपीठ निर्यातदार, आयातदार आणि इतर हितधारकांना व्यापार-संबंधित माहिती आणि संसाधनांपर्यंत विनाअडथळा पोहोच प्रदान करून सेवा वितरण सुधारण्यासाठी तयार केले आहे.

या उपक्रमात ऑफलाइन पोहोच आणि जीपीएस वैशिष्ट्यांनी  सुसज्ज एक द्विभाषिक मोबाइल ॲप्लिकेशन (अँड्रॉइड/आयओएस) देखील समाविष्ट आहे. सुरक्षा, विस्तारक्षमता आणि निरंतर सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी नियमित देखभालीची तरतूद यात करण्यात आली आहे.

हा उपक्रम भारताच्या ई-गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनाशी  सुसंगत असून, परकीय व्यापारात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देतो.

प्रमुख वैशिष्ट्ये

वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस:  सोपी, सुस्पष्ट आणि सहज समजणारी रचना जेणेकरून वापरकर्ता सुलभपणे वापर करू शकेल

वर्धित सुलभता आणि प्रतिसाद क्षमता: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दिव्यांग व्यक्तींसह सर्व वापरकर्त्यांसाठी मोबाइल-अनुकूल आणि वापरायला सुलभ.

सरकारी डिजिटल सेवांशी एकीकृत  : उत्तम सेवा वितरणासाठी विद्यमान शासकीय पोर्टल्स आणि डेटाबेससोबत अखंड  कनेक्टिविटी

बहुभाषिक समर्थन: व्यापक पोहोचसाठी भाषिणी एपीआयचा वापर करून 22 भारतीय भाषांमध्ये आशय  उपलब्ध.

कस्टम डिस्प्ले सेटिंग्स:  वापरकर्ते फॉन्टचा आकार, रंगसंगती आणि भाषेची पसंती समायोजित करू शकतात.

व्यवस्थित संचालन : स्पष्टपणे परिभाषित विभाग आणि उप-विभागांसह संरचित तीन-स्तरीय मेनू.

रिअल-टाइम अपडेट्स: सीएमएस-सक्षम प्लॅटफॉर्म, जो प्राधिकृत अधिकाऱ्यांना सामग्री त्वरित अद्ययावत करण्याची परवानगी देतो.

मानकांचे अनुपालन : जीआयजीडब्ल्यू  आणि डीबीआयएम 3.0 मार्गदर्शक तत्त्वांनुसार विकसित, उत्तम  सुरक्षा, उपयोगिता आणि सुलभता सुनिश्चित करते.

प्रमुख एकीकरण

सोशल मीडिया: दृश्यमानता आणि सहभाग वाढवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स (X, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम) सोबत एकीकरण.

ट्रेड इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्स (टीआयए) पोर्टल: प्रादेशिक आणि कमोडिटी डिव्हिजन पेजवर वास्तविक वेळेत  व्यापार डेटाचे एकीकरण.

संसद पोर्टल: वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदीय प्रश्न आणि उत्तरांचे स्वयंचलित अद्यतनीकरण, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाची गरज राहत नाही .

सीपीग्राम्स: तक्रारींच्या  सुलभ  निवारणासाठी जोडण्यात आले.


निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2252311) अभ्यागत कक्ष : 15