वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
स्टार्टअप्ससाठी 10,000 कोटी रुपयांचा ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0’ अधिसूचित
उद्यम आणि वाढीव भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
Posted On:
13 APR 2026 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2026
केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 10,000 कोटी रुपयांच्या निधीसह हा उपक्रम देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेसाठी उद्यम आणि वाढीव भांडवल गोळा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.
2016 मध्ये स्टार्टअप इंडिया कृती आराखड्याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या फंड ऑफ फंड्स फॉर स्टार्टअप्स (एफएफएस 1.0) च्या उत्कृष्ट कामगिरीवर आधारित हा नवा उपक्रम आहे.
एफएफएस 1.0 ने स्टार्टअप्ससाठी निधीची कमतरता दूर करून देशांतर्गत भांडवलाला चालना दिली होती. स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 अंतर्गत 16व्या आणि 17व्या वित्त आयोगाच्या कालखंडात पात्र वैकल्पिक गुंतवणूक निधी (AIFs) च्या वचनबद्धतेसाठी एकूण 10,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीचा मुख्य भर डीप टेक स्टार्टअप्स, लहान एआयएफ द्वारे समर्थित प्रारंभिक वाढीच्या टप्प्यातले स्टार्टअप्स, तंत्रज्ञान-चालित आणि नाविन्यपूर्ण उत्पादन क्षेत्रातले स्टार्टअप्स, तसेच क्षेत्र किंवा टप्पा-निरपेक्ष स्टार्टअप्स यासारख्या प्राधान्य क्षेत्रांवर असेल. स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 साठी एआयएफ ची निवड प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित असेल.
स्टार्टअप परिसंस्थेमधल्या अनुभवी व्यावसायिकांची समिती असलेल्या उद्यम भांडवल गुंतवणूक समितीद्वारे छाननी केली जाईल. योजनेच्या अंमलबजावणीवर निरीक्षण यंत्रणा कठोर देखरेख करणार असून, योजनेच्या अंमलबजावणी आणि कामगिरीवर देखरेख करण्यासाठी अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्यात येईल. या योजनेत सरकार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांद्वारे सह-गुंतवणुकीसाठी तरतुदी आणि योग्य प्रशासकीय सुरक्षा उपाय देखील समाविष्ट आहेत.
ही अधिसूचना खालील लिंकवर उपलब्ध आहे: https://egazette.gov.in/WriteReadData/2026/271764.pdf
* * *
सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251711)
अभ्यागत कक्ष : 22