राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासीयांना शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 13 APR 2026 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 एप्रिल 2026

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या, "भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक, बाबासाहेब, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते."

बाबासाहेब आंबेडकर हे एक कायदेपंडित, अर्थतज्ञ, प्रगाढ विचारवंत, कायदेतज्ज्ञ आणि समतावादी सामाजिक व्यवस्थेचे खंबीर पुरस्कर्ते होते. समाजातील वंचित आणि असुरक्षित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आणि त्यांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक योगदान दिले. त्यांनी केवळ असमानता दूर करण्याचा मार्गच दाखवला नाही तर भारताची लोकशाही मूल्ये आणि संवैधानिक अधिकार मजबूत करण्यातही अग्रणी भूमिका बजावली. डॉ. आंबेडकर यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या अधिकारांना अग्रक्रम दिला. त्यांचे बहुआयामी योगदान भावी पिढ्यांना देशाची सेवा आणि विकासात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी प्रेरणा देईल.

या प्रसंगी, आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श आपल्या जीवनात बिंबवण्याची आणि एक न्याय्य, समावेशक आणि प्रगतीशील राष्ट्र घडवण्यात योगदान देण्याची प्रतिज्ञा करूया.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2251702) आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Telugu , Kannada