सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहकांच्या क्रयशक्तीवर आधारित निर्देशांक-आधारभूत वर्ष 2024=100 नुसार, मार्च 2026 साठीचा अंदाज

Posted On: 13 APR 2026 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 एप्रिल 2026

 

I. महत्वाची आकडेवारी

A. राष्ट्रीय पातळीवरील निर्देशक

अखिल भारतीय, ग्राहक क्रयशक्ती आधारित निर्देशांक (CPI) च्या 2024 या आधारभूत वर्षानुसार, मार्च 2026 मध्ये वार्षिक तुलनेत, म्हणजेच मार्च 2025 च्या तुलनेत, चलनफुगवटा दर 3.40% (प्राथमिक)इतका राहिला. ग्रामीण भागासाठी हा दर, 3.63% आणि नागरी भागासाठी, 3.11% इतका राहिला आहे.

 

March, 2026 (Provisional)

February, 2026 (Final)

Rural

Urban

Combined

Rural

Urban

Combined

Inflation (%)

CPI (General)

3.63

3.11

3.40

3.37

3.02

3.21

CFPI

3.96

3.71

3.87

3.46

3.48

3.47

Index

CPI (General)

105.01

104.62

104.84

104.74

104.36

104.57

CFPI

104.01

104.38

104.14

103.79

104.04

103.88

अन्नधान्यावर आधारित चलनफुगवटा दर: अखिल भारतीय- ग्राहक अन्नधान्य क्रयशक्ती वर आधारीत, चलनफुगवट्याचा दर, मार्च 2026 मध्ये, 3.87% (प्राथमिक) इतका राहिला. ग्रामीण भागासाठी हा दर, 3.96% आणि नागरी भागासाठी, 3.71% इतका राहिला आहे.  

गृहनिर्माणवर चलनफुगवटा दर: गृहनिर्माण व्यवसायावर आधारित चलनफुगवट्याचा दर, मार्च 2026 मध्ये, 2.11% (प्राथमिक) इतका राहिला. ग्रामीण भागासाठी हा दर, 2.54% आणि नागरी भागासाठी, 1.95%, इतका आहे.  

राष्ट्रीय पातळीवर, मार्च महिन्यात, विभागनिहाय महागाई दरांची विविध क्षेत्रनिहाय माहिती देणारा तक्ता खालीलप्रमाणे:

II. फेब्रुवारी 2026 (अंतिम) अंतिम आकडेवारी- सीपीआय -आधारभूत वर्ष 2024=100

फेब्रुवारी 2026 साठीचे, 2024 हे आधारभूत वर्ष समजून काढलेले,  अखिल भारतीय CPI, CFPI आणि तुलनात्मक महागाई दराचे आकडे पुढीलप्रमाणे:

 

February, 2026 (Final) at Base 2024=100

Rural

Urban

Combined

Inflation (%)

CPI (General)

3.37

3.02

3.21

CFPI

3.46

3.48

3.47

Index

CPI (General)

104.74

104.36

104.57

CFPI

103.79

104.04

103.88

III. प्रतिसाद दर: रियल टाईम मूल्य डेटा – जो, 1407 नागरी बाजारातून, (ऑनलाइन बाजारांचाही समावेश) तसेच सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील, 1465 गावांमधून कर्मचाऱ्यांनी दर सप्ताहात घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन, संकलित करण्यात आला आहे. मार्च 2026 मध्ये, ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही बाजारातून, 100 टक्के किमती संकलित करण्यात आल्या होत्या. तर, बाजार-निहाय किमती- ग्रामीण भागातून 99.93% आणि नागरी भागातून, 100% इतकी आकडेवारी संकलित करण्यात आली होती.

एप्रिल 2026 साठीची सीपीआय आकडेवारी, 12 मे 2026 रोजी (मंगळवारी) किंवा त्या दिवशी सुट्टी असल्यास, त्याच्या पुढच्या दिवशी प्रसिद्ध केली जाईल.

मार्च 2026 साठीची, राज्ये आणि प्रत्येक वस्तू निहाय आकडेवारी ई-सांख्यिकी पोर्टलवरून https://esankhyiki.mospi.gov.in/ डाउनलोड करता येईल.

 

Click here to see pdf

* * *

सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251579) अभ्यागत कक्ष : 24