राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 13 ते 16 एप्रिल दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
12 APR 2026 6:23PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 13 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
13 एप्रिल रोजी राष्ट्रपती एम्स राजकोटच्या पहिल्या पदवीदान समारंभास उपस्थित राहतील.
14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गांधीनगर येथील लोक भवन येथे आयोजित सामाजिक समरसता महोत्सव या कार्यक्रमास राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्याच दिवशी, राष्ट्रपती गांधीनगर येथे राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभासही उपस्थित राहतील.
15 एप्रिल रोजी राष्ट्रपती एम्स नागपूरच्या दुसऱ्या पदवीदान समारंभास उपस्थित राहतील. त्याच दिवशी, नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय महसूल सेवा (प्राप्तीकर) अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या 78 व्या तुकडीच्या निरोप समारंभालाही त्या उपस्थित राहतील.
16 एप्रिल रोजी राष्ट्रपती वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या सहाव्या पदवी प्रदान समारंभास उपस्थित राहतील.
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2251350)
आगंतुक पटल : 93