पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 13 एप्रिल रोजी ‘नारी शक्ती वंदन संमेलनाला’ संबोधित करणार
विविध क्षेत्रातील नामवंत आणि कर्तृत्ववान महिलांचा संमेलनात सहभाग पहायला मिळणार
विकसित भारत 2047 च्या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर संमेलनाचा भर
निर्णय प्रक्रियेत महिलांच्या वाढत्या सहभागाचे महत्त्व संमेलनाद्वारे अधोरेखित होणार
प्रविष्टि तिथि:
12 APR 2026 4:43PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नारी शक्ती वंदन संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत आणि कर्तृत्ववान महिला सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रशासन, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योजकता, प्रसारमाध्यमे, समाजसेवा आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी एकत्र येतील. सप्टेंबर 2023 मध्ये, संसदेने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ संमत केला, जो विधिमंडळांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय ठरला. या कायद्यान्वये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता, देशभरात महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी 16 एप्रिल रोजी संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
भारताच्या विकास प्रवासाला आकार देण्यासाठी महिलांच्या जास्तीत जास्त सहभागाची वचनबद्धता दृढ करण्याच्या उद्देशाने हे संमेलन आयोजित केले जात आहे. पंचायत राज ते संसदेपर्यंत सर्व स्तरांवर प्रशासन आणि नेतृत्वामध्ये महिलांची वाढती भूमिका या संमेलनाद्वारे अधोरेखित केली जाईल. तसेच, निर्णय प्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे महत्त्व या संमेलनातून स्पष्ट केले जाणार आहे.
विकसित भारत 2047’ च्या प्रवासात महिलांच्या भूमिकेवर हे संमेलन प्रकाश टाकेल. विकसित भारताच्या संकल्पनेत 'महिलांच्या नेतृत्वाखालील विकास' हा सरकारचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचे या संमेलनातून प्रतिबिंबित होईल.
***
सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2251314)
आगंतुक पटल : 105
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada