शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 अंतर्गत सर्वसमावेशक करियर मार्गदर्शन अधिक मजबूत करण्यासाठी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिवांनी, विशेष मुलांसाठी करियर कार्डसचे केले उद्घाटन
Posted On:
08 APR 2026 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव, संजय कुमार यांनी, विशेष मुलांसाठीच्या करियर कार्डसचे नवी दिल्लीत कर्तव्य भवन इथे उद्घाटन केले.

हा उपक्रम, देशभरातील सर्व अध्ययनकर्त्यांना, करियरविषयक मार्गदर्शनात समान संधी आणि उपलब्धता देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. ही करियर कार्डस, युनिसेफ इंडियाच्या तांत्रिक सहकार्याने आणि प्रत्यक्ष तज्ञ लोकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर, एनसीईआरटी, सीआयईटी आणि पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यवसाईक अभ्यासक्रम संस्था , प्रथम शिक्षा फाउंडेशन आणि राष्ट्रीय दिव्यांग संस्था यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहेत.

यावेळी सचिवांनी, विशेष मुलांच्या समस्या लवकरात लवकर ओळखणे, त्यांच्या चाचण्या आणि त्यावर ऊयापाययोजना लवकर करण्यावर भर दिला. शालेय व्यवस्थेत, त्याशिवाय शालेय परिसरात विशेष मुलांसाठी संस्थात्मक क्षमता बांधणी करण्याच्याही सूचना दिल्या. विशेष मुलांसाठीच्या शिक्षकांच्या अतिरिक्त जागा काढण्यात आल्याचे नमूद करत, त्या रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जाव्यात, आणि नियमित शिक्षकांनाही आवश्यक ते प्रशिक्षण दिले जावे, यावर त्यांनी भर दिला. या संदर्भात, एनसीईआरटी शिक्षकांसाठी लवकरच, एससीईआरटी आणि डीआयईटी यांच्या सहकार्याने एक समर्पित प्रशिक्षण मोड्यूल बनवणार आहे.
या प्रसंगी सहसचिव प्राची पांडे यांनी माहिती दिली की, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने युनिसेफ इंडिया आणि एनसीईआरटी यांच्या सहकार्याने 29 जुलै 2024 रोजी अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमात 500 करिअर कार्ड्स असलेले करिअर मार्गदर्शन पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांनी सांगितले की, आजच्या या प्रकाशनामुळे, ही राष्ट्रीय मार्गदर्शन रचना विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी विशेषत्वाने विस्तारित करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 150 कार्ड्स सर्वसमावेशक स्वरूपात तयार करण्यात आली आहेत. सर्वसमावेशकता हे भारताच्या शिक्षण परिवर्तन प्रवासाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या प्रसंगी आर्थिक सल्लागार ए.श्रीजा यांनी आभार प्रदर्शन केले.

करिअर कार्ड्सची रचना विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांची लवकर ओळख करून देऊन त्यांच्या भविष्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी विचारपूर्वक केली आहे. प्रत्येक कार्डवर भूमिका आणि जबाबदाऱ्या, आवश्यक पात्रता आणि संभाव्य करिअर मार्गांबद्दल संक्षिप्त माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडी आणि आकांक्षांशी जुळणाऱ्या संधी शोधता येतात.
ही आकर्षक आणि सहज वापरणे शक्य असलेली कार्डे, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाचे प्रभावीपणे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता शिक्षक आणि समुपदेशकांसाठी एक मौल्यवान साधन म्हणून उपयोगी ठरतील.
यापूर्वी, एनसीईआरटीने युनिसेफच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी 500 करिअर कार्ड्स असलेले एक करिअर मार्गदर्शक पुस्तक विकसित केले होते. आता ही करिअर कार्ड्स विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी सुलभ करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नात एनसीईआरटीने युनिसेफच्या सहकार्याने विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी खास 150 करिअर कार्ड्स विकसित केली आहेत. त्यामुळे करिअर मार्गदर्शन सार्वत्रिकरित्या सुलभ आणि सर्वसमावेशक झाले आहे. आता ही कार्ड्स ब्रेल स्वरूपातही उपलब्ध आहेत.
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2250298)
अभ्यागत कक्ष : 17