कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रायसेन येथील तीन दिवसीय ‘कृषी महाकुंभ’मध्‍ये शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाच्या नवीन बहुआयामी संधी


मेळाव्यात दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि शेळीपालनाद्वारे उत्पन्न वाढीची वैज्ञानिक प्रारुपे होणार प्रदर्शित: केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

Posted On: 07 APR 2026 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2026

मध्य प्रदेशातल्या रायसेन येथे तीन दिवसीय ‘कृषी महाकुंभ’ आयोजित केला जाणार असून, त्यामध्‍ये केवळ पिकांवरच नाही तर दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन, शेतकरी उत्पादक संस्था आधारित विपणन आणि ग्रामीण महिलांच्या उपजीविकेच्या संधींवर लक्ष केंद्रित केले जाईल. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे अनेक भक्कम स्रोत तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेची संपूर्ण मूल्य साखळी - बियाण्यापासून बाजारापर्यंत आणि माशांपासून मोत्यापर्यंत - एकाच व्यासपीठावर एकत्र आणेल, असे केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

‘कृषी महाकुंभ’: संपूर्ण मूल्य साखळी एकाच व्यासपीठावर

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 11 ते 13 एप्रिलदरम्यान रायसेनमध्ये होणारा हा उत्सव उत्पादन, पशुधन, प्रक्रिया, विपणन आणि उद्योजकता यांचा समावेश असलेली संपूर्ण मूल्य साखळी एकाच ठिकाणी सादर करेल, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापासून बाजारापर्यंत आणि अगदी निर्यातीपर्यंतचा संपूर्ण प्रवास समजायला मदत होईल.

मत्स्यपालन, जलचर पालन आणि पाणी आधारित उद्योग

मत्स्यव्यवसाय विभाग आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ बायोफ्लॉक सिस्टम, पुनर्चक्रित मत्स्यपालन व्यवस्था, ॲक्वापोनिक्स, शोभिवंत मत्स्यपालन आणि मोती शेतीचे थेट प्रारुप सादर करतील. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम, मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधा विकास निधी आणि इतर उपक्रमांसारख्या योजनांची माहिती देखील दिली जाईल.

50 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संस्था आणि विपणन विभाग

विपणन विभागांतर्गत  50 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संस्था सहभागी होतील, त्या भौगोलिक मानांकन मिळालेला चिन्नोर तांदूळ, शरबती गहू, भरड धान्य आधारित उत्पादने यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने प्रदर्शित करुन त्यांची विक्री केली जाईल. 12 एप्रिल रोजी नियोजित शेतकरी उत्पादक संस्था परिषदेत संस्थात्मक व्यवस्थापन, ब्रँडिंग, पॅकेजिंग, कोल्ड चेन, लॉजिस्टिक्स आणि ई-ट्रेड प्लॅटफॉर्मवर सविस्तर चर्चा होईल.

ग्रामीण महिलांची उपजीविका आणि स्वयं-सहायता गटांचा प्रबळ सहभाग

ग्रामीण विकास मंत्रालय कृषी सखी, आजीविका दीदी, ड्रोन दीदी आणि स्वयं-सहायता गटांचा विशेष सहभाग सुनिश्चित करेल, ते ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांचे यशस्वी प्रारुप सादर करतील.

प्रशिक्षण, स्टार्टअप आणि वैज्ञानिक संवाद: तरुणांसाठी नवी क्षितीजे

शेतकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षण, सरकारी योजनांची थेट माहिती, कृषी स्टार्टअप सादरीकरण आणि शास्त्रज्ञांशी थेट संवाद हे या ‘कृषी महाकुंभ’चे तीन महत्त्वाचे स्तंभ असतील, अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली. या प्रयत्नांचा उद्देश केवळ कृषी उत्पादकता वाढवणे एवढाच नाही, तर ग्रामीण तरुणांसाठी रोजगार आणि उद्योजकतेचे नवीन मार्ग खुले करणे हासुद्धा आहे, असे त्यांनी सांगितले.


सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2249885) अभ्यागत कक्ष : 11