आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त,सरकारचा प्रतिबंधात्मक आणि स्वास्थ्यवर्धक आरोग्यसेवेवर असलेला भर केला अधोरेखित
जागतिक आरोग्य दिनानिमित्त मंत्री नड्डा यांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
07 APR 2026 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2026
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायन आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एक्स’या समाजमाध्यमवरील आपल्या पोस्ट मध्ये केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हटले आहे की,जागितक आरोग्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
"हा दिवस आपल्याला आपल्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेण्याची आणि संतुलित जीवनशैली जगण्याची आठवण करून देतो. आरोग्यसेवेच्या बाबतीत भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन शिकवण आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालणारा आहे. अशा संतुलनामुळे केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोकांचे जीवन सुधारण्यास मदत होत आहे."
"पंतप्रधान @narendramodi जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, 'आयुष्मान भारत' आणि 'पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजना' यांसारख्या क्रांतिकारी उपक्रमांनी आपली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट केली आहे. यामुळे प्रत्येक नागरिकासाठी दर्जेदार उपचार अधिक सुलभ, परवडणारे आणि सर्वसमावेशक झाले आहेत. आपली आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यदूत (आरोग्य सेवा आघाडीवर काम करणारे) यांच्या निष्ठेबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. चला, आपण सर्वजण मिळून एक आरोग्यसंपन्न आणि सामर्थ्यवान राष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया."
सुवर्णा बेडेकर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249771)
अभ्यागत कक्ष : 16