गृह मंत्रालय
बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे अभिवादन
राष्ट्रसेवा आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य अर्पण
दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठीचा संघर्ष प्रेरणादायी
प्रविष्टि तिथि:
05 APR 2026 1:03PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
‘एक्स’वरील आपल्या संदेशात अमित शाह म्हणाले:
“सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते बाबू जगजीवन राम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित केले. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी अतुलनीय योगदान दिले आणि विभाजनकारी शक्तींना ठामपणे विरोध केला. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांचा संघर्ष आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.”
***
नितीन फुल्लुके / गजेंद्र देवडा / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2249120)
आगंतुक पटल : 65