कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशात रायसेन येथे 11 ते 13 एप्रिल दरम्यान "उन्नत कृषी महोत्सव 2026: प्रदर्शन आणि प्रशिक्षणाचे" आयोजन


रायसेनचा तीन दिवसीय राष्ट्रीय कृषी मेळावा शेती क्षेत्रासाठी ठरणार आमूलाग्र परिवर्तनकारक

Posted On: 04 APR 2026 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2026

 

रायसेन येथे 11 ते 13 एप्रिल दरम्यान होणारा “उन्नत कृषी महोत्सव 2026: प्रदर्शन आणि प्रशिक्षण” हा खऱ्या अर्थाने एक आमूलाग्र परिवर्तनकारक राष्ट्रीय कृषी मेळावा ठरेल, असे केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सांगितले. या तीन दिवसांत हा महोत्सव शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन बाजारपेठेच्या संधी घेऊन येईल, असेही ते म्हणाले. चौहान यांनी आज सकाळी केंद्र आणि राज्य सरकारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रायसेन येथील दसरा मैदानाला भेट देऊन महोत्सव स्थळांची पाहणी केली आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी महोत्सवाच्या प्रचार रथांना हिरवा झेंडा दाखवला तसेच स्थानिक विचारवंत आणि मान्यवर नागरिकांशी अर्थपूर्ण संवाद साधला.

भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन, 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी रायसेन येथील दसरा मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील ‘उन्नत कृषी महोत्सव 2026: प्रदर्शन आणि प्रशिक्षण’ आयोजित करत आहे. हा कार्यक्रम केवळ एक मेळावा नसून, शेतकऱ्यांचे भवितव्य बदलण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे, असे ते म्हणाले. हे तीन दिवस शेतकरी समुदायाच्या जीवनात आशा आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील नवीन प्रगती दर्शवणारे 300 स्टॉल्स असतील.

दसरा मैदानातील कार्यक्रमाचे ठिकाण तीन भव्य हँगर्स आणि तीन सेमिनार हॉलसह विकसित करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावरील राष्ट्रीय प्रदर्शन आणि उच्चस्तरीय प्रशिक्षण सत्रांसाठी पायाभूत सुविधांची रचना करण्यात आली आहे. हँगर 1 मध्ये कृषी क्षेत्र, शेती यंत्रसामग्री, कृषी-सिंचन, पीक संरक्षण, मृदा पोषण आणि बियाण्यांचे विश्व यांना समर्पित विशेष विभाग आहेत. या हँगरचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेष आणि संशोधन विभाग, जिथे सीजीआयएआर (आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन सल्लागार गट), विविध शेतकरी सेवा आणि इतर प्रमुख संशोधन संस्था आहेत.

त्याचप्रमाणे, हँगर 2 – पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, सिंचन कंपन्या आणि मृदा पोषण तज्ञांसाठी आहे. येथे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड), राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ), राष्ट्रीय बीज महामंडळ (एनएससी), विविध भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत विविध संस्था, शेतकरी उत्पादक संघटना) आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांसारख्या प्रमुख राष्ट्रीय संस्थांचे स्टॉल्स देखील असतील. हँगर 1 आणि 2 मध्ये मिळून एकूण 300 स्टॉल्स असतील. हँगर 3 हे उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह म्हणून तयार करण्यात आले असून येथे एक भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे. हे हँगर आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून हजारो सहभागी शेतकरी आणि पाहुण्यांना सामावून घेण्यासाठी उच्च आसनक्षमतेसह विशेष दृष्टीने तयार करण्यात आले आहे.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2249067) अभ्यागत कक्ष : 20