रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना उत्तम अनुभव देण्यासाठी, भारतीय रेल्वेने मुंबईतील सेवा अधिक मजबूत केल्या


मुंबई लोकलमध्ये अतिशय गर्दीच्या  वेळी ताण कमी करण्यासाठी 4  नवीन एसी आणि 1 नॉन-एसी रेकची  भर

मुंबई लोकलमध्ये प्रत्येक प्रवाशाला आरामदायी प्रवास करता यावा  यासाठी अधिक डबे जोडण्यात आले ; 15-डब्यांच्या फेऱ्या   211 वरून 227 पर्यंत वाढल्या

3234 उपनगरीय सेवांसह (227 एसी लोकल), भारतीय रेल्वे मुंबईला दररोज सेवा पुरवते : लोकसभेत अश्विनी वैष्णव यांची माहिती

प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आयसीएफद्वारे स्वयंचलित दरवाजे असलेल्या 2 नॉन-एसी ईएमयू विकसित केल्या जात आहेत

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी 238 नवीन  12 कार रेकची खरेदी प्रक्रिया सुरू आहे

Posted On: 02 APR 2026 6:56PM by PIB Mumbai

 

सध्या, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेद्वारे एसी ईएमयू सेवांसह एकूण 3234 ईएमयू लोकल सेवा चालवल्या जातात. पश्चिम रेल्वे  133  एसी सेवांसह 1414 फेऱ्या चालवते, तर मध्य रेल्वे  94 एसी सेवांसह  1820 फेऱ्या चालवते, ज्या प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कल्याण, विरार आणि पनवेल येथील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतात. मुंबई परिसरातील विविध स्थानकांवर रेल्वेगाड्यांची हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी, विविध स्थानकांवर खालील कामे पूर्ण झाली आहेत/हाती घेण्यात आली आहेत/नियोजित आहेत:

 

SN

Location

Details

1

Bandra Terminus

3 Pit Lines have been completed

2

Mumbai Central

Platform extension for 24 LHB coaches

3

Jogeshwari

2 additional platforms

4

Dadar

1 additional platform

5

Vasai road

6 platforms, 3 pit lines and 5 stabling lines

6

Panvel-Kalamboli

5 platforms, 4 pit lines and 2 sick lines

7

Kalyan

6 platforms and 4 pit lines

8

LTT

4 platforms and 2 pit lines

9

Parel

6 platforms, 5 pit lines, 6 stabling lines

10

Virar

25 stabling lines

11

Dahanu road

11 stabling lines

12

Mira road

25 stabling lines

 

प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे :

वरील कामांव्यतिरिक्त, 15  डब्यांच्या ईएमयू गाड्या सामावून घेण्यासाठी 34 स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई उपनगरीय भागातील रेल्वे जाळ्याची क्षमता सुधारण्यासाठी, 8,087 कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी)-II, 10,947 कोटींचा एमयूटीपी--III आणि 33,690 कोटींचा एमयूटीपी-IIIA मंजूर करण्यात आले आहेत.

या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय भागातील खालील कामांचा समावेश आहे:

  SN

Name of project

Cost

(₹ in crore)

1

6th Line Mumbai Central-Borivali (30 km)

919

2

Extension of Harbour Line Goregaon-Borivali (7 km)

826

3

Virar-Dahanu Road 3rd & 4th Line (64 km)

3587

4

5th & 6th Line CSTM-Kurla (17.5 km)

891

5

Panvel-Karjat Suburban Corridor (29.6 km)

2782

6

Airoli-Kalwa (elevated) Suburban Corridor link (3.3 km)

476

7

5th & 6th line Borivali-Virar (26 km)

2184

8

4th line between Kalyan-Asangaon (32 km)

1759

9

3rd & 4th line between Kalyan-Badlapur    (14.05 km)

1510

10

Kalyan Yard-Segregation of Main Line & Suburban

866

11

Vasai bye pass line (Double line) between Naigaon and Juchandra (5.73 Km)

176

12

3rd and 4th line between Badlapur & Karjat (32.46 km)

1324

13

4th line between Asangaon & Kasara (34.97 km)

794

14

Trespass Control (34 locations)

551

 

नव्या पिढीच्या रेल्वेगाड्या :

​प्रवासी नेण्याच्या क्षमतेत वृद्धी घडवून आणण्यासाठी, मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-III आणि IIIA (MUTP-III & IIIA) अंतर्गत प्रत्येकी 12 डबे असलेल्या  238 रेल्वे गाड्यांकरता 19,293 कोटी रुपये खर्चासह मंजुरी देण्यात आली आहे. या रेल्वे गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

​भारतीय रेल्वेमधील प्रवाशांच्या वाहतुकीच्या पद्धतीचे नियमितपणे निरीक्षण केले जाते आणि अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी,  कार्यान्वयनात्मतेच्या बाबतीत वास्तवातील व्यवहार्यतेनुसार सध्याच्या गाड्यांचे डबे वाढवणे, नवीन गाड्या सुरू करणे, विद्यमान गाड्यांची सरासरी वाढवणे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.

​मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी अतिरिक्त रेल्वे गाडय़ा उपलब्ध करून देण्यासाठी उचललेली पावले खाली नमूद केली आहेत :

2025-26 या वर्षा दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत प्रत्येकी 12 डब्यांच्या चार वातानुकूलित ईएमयू रेल्वे गाड्या (मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी 2) आणि पश्चिम रेल्वे सेवेत 15 डब्यांची एक बिगर वातानुकूलित ईएमयू (Non-AC EMU) रेल्वे गाडी दाखल केली आहे.

​या व्यतिरिक्त, चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने दरवाजे स्वयंचलित पद्धतींने बंद होण्याची यंत्रणा असलेल्या दोन बिगर वातानुकूलित ईएमयू रेल्वे गाड्यांच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. या गाड्या  मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत दाखल केल्या जाणार आहेत.

​मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने (MRVC) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-III आणि IIIA अंतर्गत 12 डब्यांच्या 238 गाड्यांची खरेदी केली जाणार आहे.

केंद्रीय​रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली.

***

निलिमा चितळे/सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2248707) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English , Urdu , Gujarati , Kannada