पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिवांनी देशभरातील इंधन पुरवठा स्थितीबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसोबत आढावा बैठक घेतली
Posted On:
02 APR 2026 8:27PM by PIB Mumbai
देशभरातील इंधन पुरवठा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव (अन्न व नागरी पुरवठा) यांची बैठक झाली.
अत्यावश्यक पेट्रोलियम इंधनाचा पुरवठा सुलभ करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना माहिती दिली आणि बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारसोबत मिळून काम केल्याबद्दल संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे कौतुकही केले.
घरगुती ग्राहक आणि अत्यावश्यक क्षेत्रांना अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी एलपीजी वितरणाचे सक्रियपणे व्यवस्थापन आणि प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे यावर सचिवांनी (पेट्रोलियम) भर दिला. साठेबाजी, गैरवापर आणि अनावश्यक घबराट निर्माण करतील अशा चुकीच्या माहितीच्या प्रसाराविरुद्ध अधिक सतर्कता बाळगण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या.
उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांनी अनियमितता रोखण्यासाठी टाकलेल्या छाप्यांसारख्या सक्रिय अंमलबजावणी कारवाईबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. इतर राज्यांना देखरेख आणि अंमलबजावणी अधिक मजबूत करण्याचे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पुरवठ्याबाबत दिशाभूल करण्याचे आणि खोट्या अफवा पसरवण्याचे प्रयत्न सक्रियपणे निष्फळ ठरविण्याची विनंतीही राज्यांना करण्यात आली.
स्थलांतरित मजुरांना होणाऱ्या एफटीएल एलपीजी पुरवठ्याबाबतच्या वृत्तांवर, राज्यांनी स्पष्ट केले की एलपीजी पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आलेला नाही, ज्यामुळे स्थलांतरितांवर परिणाम होईल . पुरवठा स्थिर आहे. सचिवांनी माहिती दिली की, राज्ये स्थानिक गरजेनुसार तेल विपणन कंपन्यांच्या सहकार्याने,5 किलो एफटीएल एलपीजी सिलिंडरच्या लक्ष्यित वितरणाचे व्यवस्थापन करण्याचा विचार करू शकतात. ऑटोरिक्षांसाठीच्या एलपीजीबाबत स्पष्ट करण्यात आले की, ही मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ज्या ऑटो एलपीजी व पेट्रोल दोन्हीवर चालू शकतात, त्यांना पेट्रोल वापरण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
सचिव (पेट्रोलियम) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याची प्रशंसा केली आणि स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी व जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सतत बारकाईने देखरेख ठेवण्याचे आवाहन केले.
***
निलिमा चितळे/सुषमा काणे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Goa
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(Release ID: 2248691)
अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam