पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारकडून 8 राज्यांना 15 व्या वित्त आयोगाचे 1536 कोटी रुपयांहून जास्त अनुदानाचे वितरण


अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, झारखंड, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंडमधील पंचायती राज संस्थांना बळकटी

Posted On: 01 APR 2026 4:26PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 अंतर्गत अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, झारखंड, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड या  राज्यांमधील पंचायती राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 15 व्या वित्त आयोगाचे बंधित आणि अबंधित अनुदान वितरित केले आहे. या निधी वितरणामध्ये नियमित हप्त्यांसह विविध आर्थिक वर्षांतील प्रलंबित रकमेचाही समावेश आहे. या राज्यांमधील ग्रामीण स्थानिक प्रशासनाला अधिक बळकटी देण्यासाठी एकूण 1536.14 कोटी रुपयांचा निधी एकत्रितपणे वितरित करण्यात आला आहे.

Sl. No.

Name of State

Grant Component

Amount (Rs. in Crore)

Installment / Year

Eligible Panchayats of the State

1.

Arunachal Pradesh

Tied

53.10

1st Installment for FY 2022-23

All 25 eligible DPs and all 2108 eligible GPs

2.

Goa

Tied

18.27

1st Installment for FY 2024-25

All 2 eligible DPs and 187 eligible GPs

3.

Gujarat

Untied

2.98

Withheld portion of 1st and 2nd Installments for FY 2025-26

Additionally 1 eligible BP, 21 eligible GPs and all 23 newly constituted GPs (for both installments)

 

 

Tied

4.47

Withheld portion of 1st and 2nd Installments for FY 2025-26

Additionally 1 eligible BP, 21 eligible GPs and all 23 newly constituted GPs (for both installments)

4.

Jharkhand

Tied

405.23

1st Installment for FY 2025-26

All 24 eligible DPs, all 264 eligible BPs and 4344 eligible GPs

 

 

Tied

2.67

Withheld portion of 1st Installment for FY 2024-25

Additionally 11 eligible BPs and 1 eligible GP

 

 

Tied

2.67

Withheld portion of 2nd Installment for FY 2024-25

Additionally 11 eligible BPs and 1 eligible GP

5.

Odisha

Tied

53.13

Withheld portion of 1st and 2nd Installments for FY 2025-26

Additionally 10 eligible DPs, 17 eligible BPs and 40 eligible GPs (for both installments) and 15 eligible GPs (for 2nd installment only)

6.

Rajasthan

Tied

466.79

2nd Installment for FY 2025-26

32 eligible DPs, 347 eligible BPs and 3857 eligible GPs

 

 

Tied

15.44

Withheld portion of 1st Installment for FY 2025-26

Additionally 8 eligible ZPs and 8 eligible BPs

7.

Telangana

Tied

371.91

1st Installment for FY 2025-26

12600 eligible GPs

8.

Uttarakhand

Tied

136.58

2nd Installment for FY 2025-26

All 13 eligible DPs, 94 eligible BPs and 7766 eligible GPs

 

 

Tied

2.90

Withheld portion of 1st Installment for FY 2025-26

Additionally 2 eligible BPs and 198 eligible GPs

Grand Total

Rs. 1,536.14 crore

 

*GPs / BPs / DPs / ZPs: Gram Panchayats / Block Panchayats / District Panchayats / Zila Panchayats

 

पार्श्वभूमी :

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या खर्च विभागाने 15 व्या वित्त आयोगाच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या अनुदानाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, पंचायती राज मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालय (पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग) यांच्या शिफारशीनंतर, अर्थ मंत्रालयामार्फत राज्यांमधील ग्रामीण स्थानिक संस्थांसाठी हे अनुदान वितरित केले जाते. विहित केलेल्या अनुदानाची शिफारस आणि वितरण एका आर्थिक वर्षात 2 हप्त्यांमध्ये केले जाते. 15 व्या वित्त आयोगाच्या या शिफारसी 31 मार्च 2026 पर्यंतच्या 6 वर्षांच्या कालावधीसाठी लागू आहेत.

अबंधित अनुदानाचा वापर पंचायती राज संस्था/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे संविधानाच्या 11 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 29 विषयांतर्गत स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. मात्र, या निधीचा वापर पगार आणि इतर आस्थापना खर्चासाठी करता येत नाही.

बंधित अनुदानाचा वापर खालील मूलभूत सेवांसाठी केला जाऊ शकतो:

(अ) स्वच्छता आणि हागणदारी मुक्ती, घरगुती कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया, तसेच मानवी मलमूत्र व सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रामुख्याने समावेश आहे;

(ब) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि पाण्याचा पुनर्वापर.

 ***

शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2247923) अभ्यागत कक्ष : 21