पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून संस्कृत सुभाषित सामायिक; डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामींना वाहिली आदरांजली.
Posted On:
01 APR 2026 10:37AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील स्वामीजींचे अतुलनीय योगदान राष्ट्राच्या प्रत्येक पिढीला निस्वार्थ सेवेसाठी प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी स्वामीजींच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित देखील सामायिक केले:
“पिबन्ति नद्यः स्वयमेव नाम्भः
स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः।
नादन्ति सस्यं खलु वारिवाहाः
परोपकाराय सतां विभूतयः॥”
पंतप्रधानांनी 'एक्स' वर लिहिले;
मानवतेचे निसिम भक्त परम पूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम! शिक्षण, समाजकल्याण आणि अध्यात्म या क्षेत्रांतील त्यांचे अतुलनीय योगदान देशाच्या प्रत्येक पिढीला निस्वार्थ सेवेसाठी प्रेरित करत राहील.
***
NehaKulkarni / RajDalekar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2247569)
अभ्यागत कक्ष : 11