पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहारमधल्या नालंदा येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख


पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून जाहीर केली मदत

Posted On: 31 MAR 2026 1:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मार्च 2026

 

बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यात चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना केली आहे. 

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या निकटतम नातेवाईकाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. 

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे :

''बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यातली दुर्घटना खूप वेदनादायी आहे.  ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी मी प्रार्थना करतो. 

पीएमएनआरएफमधून मृतांच्या निकटतम नातेवाईकाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल : PM @narendramodi”

 

* * *

हर्षल आकुडे/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2247236) अभ्यागत कक्ष : 12