पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल बालेंद्र शाह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन

Posted On: 27 MAR 2026 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

 

बालेंद्र शाह यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले, तुमची नियुक्ती ही नेपाळच्या जनतेने तुमच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. भारत-नेपाळ मैत्री आणि दोन्ही कडील जनतेला  परस्पर लाभदायक सहकार्य नव्या उंचीवर जाईल या विश्वासाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आहे.”

मोदी यांनी ‘X’ वरील संदेशात म्हटले आहे,

“नेपाळच्या पंतप्रधानपदी शपथ घेतल्याबद्दल बालेंद्र शाह यांना हार्दिक शुभेच्छा.

तुमची नियुक्ती ही नेपाळच्या जनतेच्या  तुमच्या नेतृत्वावरच्या  विश्वासाचे प्रतीक आहे.आपण एकत्रितपणे भारत-नेपाळ मैत्री आणि दोन्ही कडील जनतेला  परस्पर लाभदायक सहकार्य नव्या उंचीवर नेऊ याचा मला विश्वास आहे.”

@ShahBalen

 

* * *

निलिमा चितळे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246335) अभ्यागत कक्ष : 12