राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राम नवमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या

Posted On: 25 MAR 2026 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे, "राम नवमीच्या शुभ प्रसंगी, मी सर्व देशवासीयांना आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देते."

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त हे पर्व साजरे केले जाते. सत्य, न्याय आणि सदाचाराच्या मार्गावर चालणे हा जीवनात पुढे जाण्यासाठीचा योग्य मार्ग आहे याची शिकवण भगवान श्रीराम यांचा जीवनप्रवास आपल्याला देतो. भगवान श्रीराम यांचे जीवन आपल्याला समाजाप्रति आपली कर्तव्ये पार पाडण्याची प्रेरणा देते. भगवान श्रीराम यांचा आदर्श हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे आणि आपण त्या आदर्शांनुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

या शुभप्रसंगी, आपण भगवान श्रीराम यांच्या महान गाथेतील शिकवण आत्मसात करूया आणि आपले विचार, वाणी आणि कृतीमधून राष्ट्र सेवा करण्याची प्रतिज्ञा करूया.”

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245469) अभ्यागत कक्ष : 16