गृह मंत्रालय
गुजरातमध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि विधेयकाला पाठींबा देणाऱ्या सर्व आमदारांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 MAR 2026 5:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2026
गुजरातमध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि विधेयकाला पाठींबा देणाऱ्या सर्व आमदारांचे अभिनंदन केले.
अमित शाह X वरील संदेशात म्हणाले, “देशातील प्रत्येक नागरिकासाठी एकसमान कायदा असावा हा आमच्या पक्षाचा स्थापनेपासूनच संकल्प आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाची राज्य सरकारे या दिशेने सातत्याने पुढे वाटचाल करत आहेत. उत्तराखंडनंतर गुजरातनेही समान नागरी संहिता विधेयक मंजूर करण्याचे ऐतिहासिक कार्य करून आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे. मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे अभिनंदन करतो. देशाचे शासन तुष्टीकरणावर नव्हे तर सर्व नागरिकांसाठी समान कायद्यांवर चालावे याला आमचे प्राधान्यही आहे आणि कटीबद्धताही आहे.”
* * *
निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2245227)
आगंतुक पटल : 64