राष्ट्रपती कार्यालय
ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा
Posted On:
20 MAR 2026 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे, “ईद-उल-फित्रच्या शुभप्रसंगी, मी सर्व देशवासियांना विशेषतः भारतात आणि परदेशात राहणाऱ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देते."
रमजानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर साजरा केला जाणारा हा सण, आत्मसंयम, सेवा आणि वंचित वर्गाप्रती करुणेचा संदेश देतो. तसेच तो प्रेम, बंधुत्व, शांतता आणि एकोप्याचाही संदेश देतो.
हा सण आपल्याला आठवण करून देतो की, आपण समाजातील सर्व व्यक्तींच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या निमित्ताने, आपण गरजू लोकांना मदत करण्याचा, समाजात एकता आणि सौहार्द वाढवण्याचा आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा संकल्प करूया.
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243149)
अभ्यागत कक्ष : 16