पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मलेशियाच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
हरी राया ऐदिलफित्री सणाच्या शुभेच्छा; पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा
Posted On:
19 MAR 2026 5:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शुभेच्छांची देवाणघेवाण केली तसेच पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी संवाद साधताना आगामी हरी राया ऐदिलफित्री सणाच्या निमित्ताने त्यांना आणि मलेशियाच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील चिंताजनक परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि तणाव कमी करण्यासाठी आपल्या सामायिक बांधिलकीची पुनरुच्चार केला. संवाद आणि राजनैतिक मार्गाने लवकरात लवकर शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले:
“माझे मित्र, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी मी आज संवाद साधला आणि आगामी हरी राया ऐदिलफित्री सणाच्या निमित्ताने त्यांना व मलेशियाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
पश्चिम आशियातील चिंताजनक परिस्थितीवरही चर्चा केली आणि तणाव कमी करण्यास तसेच संवाद व राजनैतिक मार्गाने शांतता व स्थैर्य लवकर प्रस्थापित करण्याबाबत आमची सामायिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.”
* * *
राधिका अघोर/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242597)
अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada