राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेती चांद, नवरेह आणि साजीबू चेरोबा या सणांच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासीयांना शुभेच्छा

Posted On: 18 MAR 2026 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेती चांद, नवरेह आणि साजीबू चेरोबा या सणांच्या  पूर्वसंध्येला  देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका संदेशात राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे की, "चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेती चांद, नवरेह आणि साजीबू चेरोबा या शुभ प्रसंगी, मी भारत आणि परदेशातील सर्व देशवासीयांना शुभेच्छा देते.

नववर्षाच्या आगमनानिमित्त साजरे केले जाणारे हे उत्सव भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि निसर्गाशी असलेले आपले सखोल नाते यांचे प्रतीक आहेत. जीवनात नवीन आशा, नवीन संकल्प आणि सकारात्मकतेच्या भावनेसह पुढे जाण्यासाठी हे उत्सव आपल्याला प्रेरणा देतात. हे सण- उत्सव आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि इतरांशी आनंद वाटून घेण्याच्या आपल्या परंपरांचे चैतन्यमयी आविष्कार आहेत.

हे उत्सव प्रेम आणि सौहार्दाच्या माध्यमातून भारतातील विविध समुदायांमध्ये एकोपा वृध्दिंगत करोत  आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि कल्याण घेवून येवोत"

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे –

निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2242208) अभ्यागत कक्ष : 8