पंतप्रधान कार्यालय
आव्हानांवर मात करण्यासाठी लागणारे धैर्य आणि इच्छाशक्ती यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2026 8:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जीवनातील सर्वात कठीण अडथळ्यांवर मात करण्यात आत्मविश्वास तसेच आंतरिक सामर्थ्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.
पंतप्रधान म्हणाले की, धैर्य आणि निर्धाराने युक्त व्यक्तीसाठी जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपण सर्वात कठीण आव्हानांवर मात करू शकतो याला पंतप्रधान मोदी यांनी दुजोरा दिला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
"जी व्यक्ती साहस आणि निर्धाराने परिपूर्ण आहे तिच्यासाठी जीवनात काहीही अशक्य नाही. आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपण कठीणात कठीण आव्हानांवर मात करू शकतो
एकोऽपि सिंहः साहस्रं यूथं मथ्नाति दन्तिनाम् ।
तस्मात् सिंहमिवोदारमात्मानं वीक्ष्य सम्पतेत्॥"
ज्याप्रमाणे एका सिंहामध्ये हजार हत्तींवर मात करण्याचे सामर्थ्य असते त्याच पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने धैर्य, आत्मविश्वास आणि अंतर्गत सामर्थ्यासह निर्भयतेने उदात्त कार्यांमध्ये सहभागी व्हायला हवे.
***
NehaKulkarni / SanjanaChitnis / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2241052)
आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam