पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओदिशातील कटक इथे रुग्णालयात आग लागल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


प्रधान मंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची केली घोषणा

Posted On: 16 MAR 2026 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशातील कटक इथे एका रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा मोदी यांनी व्यक्त केली.

प्रधान मंत्री राष्ट्रीय मदत निधी - पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला दोन  लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

आपल्या एक्सवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले,  

“ओडिशातील कटक इथे एका रुग्णालयात झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांचे सांत्वन. जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो.

पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये मदत दिली जाईल. जखमी व्यक्तीला 50,000 रुपये दिले जातील - पंतप्रधान”

 

"ଓଡ଼ିଶାର କଟକରେ ଏକ ହସ୍ପିଟାଲରେ ଘଟିଥିବା ଦୁର୍ଘଟଣା ଗଭୀର ଯନ୍ତ୍ରଣାଦାୟକ। ଯେଉଁମାନେ ନିଜ ପ୍ରିୟଜନଙ୍କୁ ହରାଇଛନ୍ତି ସେମାନଙ୍କ ପ୍ରତି ସମବେଦନା। ଆହତମାନଙ୍କ ଆଶୁ ଆରୋଗ୍ୟ ପାଇଁ ମୁଁ ପ୍ରାର୍ଥନା କରୁଛି।

ପ୍ରତ୍ୟେକ ମୃତକଙ୍କ ନିକଟ ସମ୍ପର୍କୀୟଙ୍କୁ ପିଏମଏନଆରଏଫରୁ ୨ ଲକ୍ଷ ଟଙ୍କାର ଅନୁକମ୍ପାମୂଳକ ସହାୟତା ପ୍ରଦାନ କରାଯିବ । ଆହତମାନଙ୍କୁ ୫୦,୦୦୦ ଟଙ୍କା ଦିଆଯିବ: ପ୍ରଧାନମନ୍ତ୍ରୀ @narendramodi"

 

* * *

नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2240710) अभ्यागत कक्ष : 12