रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
NHAI 1 एप्रिल 2026 पासून आर्थिक वर्ष 2026-27 साठी फास्टॅगच्या वार्षिक पास शुल्कात सुधारणा करणार
Posted On:
15 MAR 2026 12:20PM by PIB Mumbai
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आर्थिक वर्ष 2026-27साठी 'फास्टॅग वार्षिक पास'चे सध्याचे शुल्क 3000 रुपयांवरून 3,075 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. हे वाढीव शुल्क 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. शुल्कातील ही सुधारणा 'राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दरांचे निर्धारण आणि वसुली) नियम, 2008' मधील तरतुदींनुसार करण्यात आली आहे. 56 लाखांहून अधिक वापरकर्त्यांसह, खाजगी वाहन मालकांमध्ये' फास्टॅग वार्षिक पास'चा स्वीकार सातत्याने वाढत आहे.
हे सुधारित दर राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवरील सुमारे 1,150 टोल प्लाझांवर वार्षिक पास सुविधा घेऊ इच्छिणाऱ्या वैध फास्टॅग असलेल्या पात्र गैर-व्यावसायिक वाहनांसाठी लागू असेल. फास्टॅग वार्षिक पासमुळे एकदाच शुल्क भरून एका वर्षाची वैधता किंवा 200 टोल प्लाझा क्रॉसिंगपर्यंत वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज राहत नाही. हा पास वैध फास्टॅग असलेल्या सर्व गैर-व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे.
एकदाच शुल्क भरल्यानंतर राजमार्गयात्रा अॅप किंवा एनएचएआयच्या संकेतस्थळाद्वारे केलेल्या पेमेंटच्या दोन तासांच्या आत वाहनाशी लिंक असलेल्या विद्यमान फास्टॅग वर वार्षिक पास सक्रिय होतो.
15 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात आलेल्या फास्टॅग वार्षिक पासला देशभरातील राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या वाहनचालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, या सुविधेमुळे अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
***
यश राणे / हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2240332)
अभ्यागत कक्ष : 25