कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देश कोणत्याही अभूतपूर्व कोळसा मागणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज

Posted On: 11 MAR 2026 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2026

या वर्षी कोळसा उत्पादन आणि पुरवठा हा वापरापेक्षा जास्त राहिला आहे, परिणामी औष्णिक वीज प्रकल्प आणि कोळसा खाणींमध्ये विक्रमी उच्च कोळशाचा साठा शिल्लक आहे. शिवाय, नियमन नसलेल्या क्षेत्राला होणारा पुरवठा मागील वर्षाच्या तुलनेत जवळजवळ 14% अधिक झाला आहे.

1 एप्रिल 2025 रोजी कोल इंडिया लिमिटेड च्या खाणींमध्ये पिटहेड कोळशाचा साठा 106.78 मेट्रिक टन होता. तो 9 मार्च 2026 रोजी 121.39 मेट्रिक टन झाला आहे. शिवाय, एससीसीएलच्या खाणींमध्ये सुमारे 6.07 मेट्रिक टन कोळसा आहे. तसेच, कॅप्टिव्ह आणि कमर्शियल खाणींमध्ये आणखी 15.12 मेट्रिक टन तर सुमारे 14 मेट्रिक टन कोळसा ट्रान्झिटमध्ये आहे. अशा प्रकारे देशातील एकूण कोळसा साठा 156.58 मेट्रिक टन या आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. हा कोळशाचा साठा औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये आधीच उपलब्ध असलेल्या कोळशाव्यतिरिक्त आहे. 09 मार्च 2026 रोजी प्रकल्पांमध्ये सुमारे 54.05 मेट्रिक टन साठा उपलब्ध असून सध्याच्या वापराच्या दराने तो जवळजवळ 24 दिवसांसाठी पुरेसा असेल.

याप्रमाणे, देशात उपलब्ध असलेला एकूण कोळशाचा साठा सुमारे 210 मेट्रिक टन आहे, जो सुमारे 88 दिवसांसाठी पुरेसा असेल.

देशातील कोळशाचे उत्पादन पूर्वीच्याच वेगाने सुरू असून खाण पातळीवर साठा वाढत आहे. यामुळे भारतीय रेल्वेच्या महत्त्वपूर्ण सहकार्यातून ग्राहकांच्या गरजेनुसार पुरेसा पुरवठा राखण्यासाठी मदत होत आहे. 

कोळसा मंत्रालय स्थिर आणि कार्यक्षम वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी धोरणात्मक सहाय्य, कामगिरीचे सातत्याने निरीक्षण आणि सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधला जात आहे. याचा उद्देश देशातील प्रमुख क्षेत्रांना अखंडित कोळसा उपलब्धता सुनिश्चित करणे, ऊर्जा गरजा पूर्ण करणे आणि दीर्घकालीन राष्ट्रीय उद्दिष्ट ‘विकसित भारत 2047’ साध्य करण्यासाठी योगदान देणे हे आहे.

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2238520) अभ्यागत कक्ष : 13