कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2025-26 या वर्षासाठी प्रमुख कृषी पिकांच्या (खरीप आणि रब्बी) उत्पादनांचा दुसरा आगाऊ अंदाज केला जाहीर

प्रविष्टि तिथि: 10 MAR 2026 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2026

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2025-26 या वर्षासाठी प्रमुख कृषी पिकांच्या (खरीप आणि रब्बी) उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रमुख कृषी पिकांच्या आकडेवारीला मान्यता देताना आणि ती जाहीर करताना सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अविरत कार्य करत आहे.याचा परिणाम म्हणून,आपले कृषी क्षेत्र सातत्याने प्रगतीपथावर आहे.

यावेळी अन्नधान्य उत्पादनाची परिस्थिती उत्तम आणि विक्रमी पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. 2025–26 च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, खरीप अन्नधान्य उत्पादन 1741.44 लाख मेट्रिक टन (एलएमटी) आणि रब्बी अन्नधान्य उत्पादन 1745.13 एलएमटी होईल असा अंदाज आहे. गतवर्षी खरीप अन्नधान्य उत्पादन 1694.60 एलएमटी आणि रब्बी अन्नधान्य उत्पादन 1691.66 इतके झाले होते.यंदाचे उत्पादन हे गतवर्षीच्या एलएमटीच्या तुलनेत अनुक्रमे  46 एलएमटी (2.8%) आणि 53 एलएमटी (3.2%) इतके अधिक आहे.

2024-25 मधील 1227.72 एलएमटीच्या तुलनेत खरीप तांदळाचे उत्पादन 1239.28 एलएमटी होण्याचा अंदाज आहे, जो 11.56 एलएमटी वाढ दर्शवितो. रब्बी तांदळाचे उत्पादन 167.20 एलएमटी होण्याचा अंदाज आहे.गव्हाचे उत्पादन 1202.10 एलएमटी होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या 1179.45 एलएमटी उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन 22.65 एलएमटीने अधिक होण्याचा अंदाज आहे.

श्रीअन्नचे (खरीप) उत्पादन 123.43 एलएमटी आणि श्रीअन्नचे (रबी)  उत्पादन 30.98 एलएमटी होण्याचा अंदाज आहे. खरीपाच्या मक्याचे उत्पादन विक्रमी असून 302.47 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे तर  रब्बी मक्याचे उत्पादनही  विक्रमी होण्याचा अंदाज असून 159.03 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे पोषक धान्य/ भरड  धान्यांच्या उत्पादनातही चांगली वाढ होईल.

तूर आणि हरभरा यांचे उत्पादन अनुक्रमे 34.55 एलएमटी आणि 117.92 एलएमटी होण्याचा अंदाज असून  मसूराचे उत्पादन 17.33 एलएमटी होण्याचा अंदाज आहे.

सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2237807) आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Kannada , Odia , English , Urdu , हिन्दी , Gujarati