गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या देशातील ‘नारी शक्ती’ला शुभेच्छा



समाजात ‘नारी शक्ती’ने बजावलेल्या अद्वितीय भूमिकेबद्दल मानवजात ऋणी आहे

पिढ्यांचे संगोपन करत त्या वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देतात आणि आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मोलाची भूमिका बजावतात

हीच गाढ कृतज्ञतेची भावना पंतप्रधान मोदी यांच्या महिला-नेतृत्वाखालील विकास या संकल्पनेला प्रेरणा देते, ज्यामध्ये महिला केवळ प्रगतीच्या साक्षीदार नसून देशाला महानतेकडे नेणाऱ्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत

प्रविष्टि तिथि: 08 MAR 2026 3:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशातील ‘नारी शक्ती’ला शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात शाह म्हणाले की,

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या ‘नारी शक्ती’ला हार्दिक शुभेच्छा. समाजात ‘नारी शक्ती’ने बजावलेल्या अद्वितीय भूमिकेबद्दल मानवजात तिची ऋणी आहे. पिढ्यांचे संगोपन करण्याबरोबरच त्या वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देतात आणि आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मोलाची भूमिका बजावतात. हीच गाढ कृतज्ञतेची भावना पंतप्रधान मोदी यांच्या महिला-नेतृत्वाखालील विकास या दृष्टीकोनाला प्रेरणा देते. या दृष्टीकोनात महिला केवळ प्रगतीच्या साक्षीदार नसून देशाला महानतेकडे नेणाऱ्या परिवर्तनकर्त्या म्हणून पुढे येत आहेत.

***

शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2236654) आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam