राष्ट्रपती कार्यालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2026 3:29PM by PIB Mumbai
दरवर्षी 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की :-
“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी देशातील सर्व नागरिकांचे विशेषतः महिलांचे हार्दिक अभिनंदन करते आणि मन:पूर्वक शुभेच्छा देते.
महिला या आपल्या समाजाचा आणि राष्ट्राचा भक्कम पाया आहेत. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, कला आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रात महिलांनी आपली प्रतिभेचे आणि कठोर परिश्रमाचे दर्शन घडवले आहे.
शिक्षित, स्वावलंबी आणि सशक्त महिला समृद्ध आणि प्रगत राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. आजच्या तरुण महिला नव्या भारताच्या स्वप्नांना आकार देत आहेत. त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. चला, आपण सर्वजण मिळून अशा समाजासाठी कार्य करूया जिथे महिलांना समान संधी मिळतील आणि त्या आपल्या क्षमतेच्या बळावर यश संपादन करू शकतील.
महिला दिनाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि सर्व महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देते.”
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2236358)
आगंतुक पटल : 94