पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बहारिनच्या राजांशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद

प्रविष्टि तिथि: 02 MAR 2026 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारिनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला

यावेळी पंतप्रधानांनी बहारिनवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. या कठीण समयी भारत बहारिनच्या लोकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

बहारिनमधील भारतीय समुदायाला मदत करुन त्यांची काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी बहारिनच्या राजांचे आभार मानले.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात  लिहिले आहे :

“बहारिनचे शाह,  महामहिम हमद बिन इसा अल खलिफा यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. बहारिनवर झालेल्या हल्ल्यांचा भारत निषेध करत असून या कठीण काळात तिथल्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत. बहारिनमधील भारतीय नागरिकांना  सातत्याने मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

सोनाली काकडे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2234781) आगंतुक पटल : 79
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam