पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधानांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
02 MAR 2026 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील घडामोडींबाबत चर्चा केली. सौदी अरेबियात नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान मोदी यांनी कठोर शब्दांत निषेध केला. हे हल्ले सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले.
पश्चिम आशियात लवकरच शांतता व स्थैर्य पुनर्प्रस्थापित होणे सर्वात महत्त्वाचे असल्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
सौदी अरेबियातील भारतीयांची या कठीण काळात काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी सौदीच्या युवराजांचे आभार मानले
पंतप्रधानांनी 'एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिले आहे :
“सौदी अरेबियाचे पंतप्रधान आणि युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत चर्चा केली. सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचे व प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करत तिथे झालेल्या हल्ल्यांचा भारत निषेध करतो. लवकरच शांतता व स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होणे सर्वात महत्त्वाचे असल्याबाबत आमचे एकमत झाले. या संघर्षाच्या काळात भारतीय समुदायाची काळजी घेत असल्याबद्दल मी सौदीच्या युवराजांचे आभार मानले.”
सोनाली काकडे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2234768)
आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam